Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरीतील सर्वंकश विद्या मंदिर येथे १ ऑक्टोबर पासून देण्यात येणार बॅडमिंटन प्रशिक्षण



रत्नागिरीतील सर्वंकश विद्या मंदिर येथे १ ऑक्टोबर पासून देण्यात येणार बॅडमिंटन प्रशिक्षण

 रत्नागिरीतील बॅडमिंटन प्रेमींसाठी सुवर्णसंधी!

रत्नागिरी प्रतिनिधी:-

रत्नागिरी जिल्ह्यातील बॅडमिंटन प्रेमिंसाठी एक सुवर्णसंधी मिळणार आहे. ती सुद्धा मासिक केवळ २००० रुपये अधिक जी.एस.टी. एवढे माफक शुल्क भरुन. रत्नागिरीतील सर्वंकश विद्या मांदिर येथे १ ऑक्टोबर पासून बॅडमिंटन प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. वय वर्षे सहा पासून कोणत्याही वयोगटातील विद्यार्थी तसेच बॅडमिंटन प्रेमी यांना बॅडमिंटनचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी भव्य बॅडमिंटन कोर्टची देखील उभारणी करण्यात आली आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन सर्टिफाईड कोच म्हणून असलेले श्री सुधिर कुमार चैनुरु हे प्रशिक्षक असणार आहेत. 

यासंदर्भात सर्वंकश विद्या मंदिर येथे नुकतीच पत्रकार परिषद पार पडली. यावेळी सर्वंकश विद्या मंदिरचे सर्वेसर्वा अर्जुन गद्रे म्हणाले की बॅडमिंटन या खेळासाठी चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. आपल्या कोकणातील मुलांना त्याची गरज आहे. चांगले प्रशिक्षण मिळाल्यास आपले विद्यार्थी ज्युनियर, सब ज्युनियर कॅटैगरी मधून राज्य, राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळू शकतील आणि यशही संपादित करु शकतील. बॅडमिंटनसाठी स्किल आणि फिजिकल फिटनेस या दोघांचीही सांगड महत्त्वाची असते. त्यासाठी फिजिकल फिटनेससाठी देखील प्रशिक्षक नेमण्यात आलेले आहेत. रत्नागिरीतील जयस्तंभापासून तीन किलोमीटर अंतरावर सर्वंकश विद्या मंदिर आहे. नजिकच समुद्रकिनारा देखील आहे. तिथे जाऊन फिजिकल फिटनेससाठी रनींग करता येऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी गाडीची व्यवस्था करण्यात येणार आहे.संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून बॅचेस सुरु होतील. बॅडमिंटन हा खेळ मुंबई, पुण्यासारख्या शहरात खुप खर्चिक असतो. परंतू आम्ही हे प्रशिक्षण माफक शुल्क आकारुन देत आहोत. त्यामुळे आमच्या या आमंत्रणाचा रत्नागिरीकरांनी स्विकार करुन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन अर्जुन गद्रे यांनी केले आहे.



....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा