Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

आपल्या अवती भोवती असणाऱ्या अनेक "सिद्धार्थ शुक्लांचे" काय?


 आपल्या अवती भोवती असणाऱ्या अनेक "सिद्धार्थ शुक्लांचे" काय?

                दोन सप्टेंबरची सकाळ उगवत असतानाच छोट्या पडद्यावरील वलयांकित तारा सिद्धार्थ शुक्लाचे अवघ्या चाळीशीत असे अचानक जाणे त्याच्या चाहत्यांसोबतचं अनेकांना चटका लावणारे आहे. स्वतःला सिद्ध करण्याचे,परिस्थितीशी दोन हात करत संघर्ष करण्याचे हे वय असते. त्याच वयातील सिध्दार्थच्या ह्रदयविकारामुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे, परत एकदा बदललेली जीवनशैली चर्चेच्या केंद्रभागी येणार आहेच, पण फक्त चर्चा करुन सोडून देण्याइतपत हा प्रश्न आता साधा राहिलेला नाही. आज शहरी भागात होणारे असे अपघात ग्रामीण भागासाठीही धोक्याची घंटा आहे, हेही गांभीर्याने लक्षात घेणे काळाची गरज आहे. कारण भारतातील 30% युवक नैराश्य , हृदय विकार आदी समस्येने ग्रासलेले आहे. ज्यात शहरात राहणारे, ग्रामीण भागातून शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, रोजंदारीसाठी शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

शिक्षणासाठी करावी लागणारी मरमर, ती संपली की नोकरीसाठी करावी लागणारी प्रचंड स्पर्धा, त्यातच समाज, नातेवाईक, कुटुंबाचे मानसिक दडपण इत्यादी सोबतच बदललेल्या दैनंदिन जीवनशैलीमुळे व क्षमतेपेक्षा जास्त अपेक्षांमुळे वाढलेला ताणतणाव या सर्वांचा परिणाम युवकांच्या मानसिकतेवर होत असून यामुळे नैराश्याचे प्रमाण सर्वच क्षेत्रात वाढताना दिसत आहे. नैराश्यामुळे भारतातील सळसळणारी जीगरबाज तरुण पिढी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, गरज आहे वेळीच सावध पाऊले उचलण्याची अन्यथा पुढील पिढ्यांना आपण अंधकराच्या छायेत ढकलत आहोत, यासाठी आपणच जबाबदार असणार आहोत.

  आजचे जीवन विशेषतः आपण खा ऊ जा धोरण स्वीकारल्यापासून व जागतिक बाजारपेठा सहज उपलब्ध झाल्यापासून प्रचंड स्पर्धा सुरू झाली. साधी उसंत मिळणे ही कठीण होऊन बसले, यातूनच मागच्या पिढीकडे पैसे  आले. त्यांनी स्वतःला न मिळालेल्या सर्व सुख सोयी सरसकट आपल्या पाल्याना दिल्या. त्यातूनच बदलत्या जीवनशैलीची नकारात्मक लक्षणे दिसू लागली. आता हळूहळू ती बाहेर येऊन दरवाजा ठोठावू लागली आहेत. सिध्दार्थचा दरवाजा उघडला, आता आपली दरवाजे उघडू द्यायची नसतील तर आपली जीवनशैली सकारात्मक ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील काही गोष्टीचे पालन आपण आपल्या गरजेनुसार करावे.

 अयोग्य जीवन शैलीचा परिणाम: लठ्ठपणाचे

 जगातील सर्वात मोठी समस्या, बैठ्या जीवनशैली व अनावश्यक पदार्थ व जंक फूड खाण्याचा हा परिणाम, त्यामुळे शरीरास हानीकारक पदार्थांना कायमचे अलविदा करा. आपला लठ्ठपणा नियंत्रण आहे का? हे

 पाहण्यासाठी पुढील कृती करा; 

  आपली सेंटीमीटर उंची इंचात करून ती निम्मी करायची, समजा तुमची निम्मी संख्या 32 आली त्यानंतर कंबरेचा घेर मोजा तो 32 पेक्षा जास्त भरला तर त्वरित योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर कमरेचा घेर 32 भरला तर  तुम्हाला लठ्ठपणा नाही.

  नियमितपणे शारीरिक चाचणी -

   योग्य डॉक्टरांडून कुटुंबातील सर्व सदस्यांची नियमितपणे किमान दर सहा महिन्यातून एकदा शारीरिक चाचणी आवश्य करावी.*

व्यसन टाळणे-

 ब्रेकअप झालं पी दारू, फेल झाला कर व्यसन, मित्र म्हणाले, साहेबांनी आग्रह केला, आशा आमिषाला बळी पडू नये. कोणत्याही प्रकारे केलेले व्यसन कुटुंबातील मानसिक स्वास्थ्य बिघडवते व शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम करते.

ताणतणाव व्यवस्थापन- 

    ताणतणाव टाळणे अगदीच अशक्य असेल तर ,आठवड्यातून एक दिवस विश्रांती घ्या. दिवसातून किमान एक वेळा जेष्ठ नागरिकांशी बोला. लहानाशी लहान होऊन खेळा. योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा किमान 30 मिनिटे कराच. दैनंदिन

 जीवनाला अध्यात्माची जोड द्या.

    चौरस आहार-आहाराकडे आवर्जून लक्ष द्या, आपल्या परिसरात पिकणाऱ्या, भाज्या, फळे, कडधान्ये, आवर्जून खा. जेवणाच्या वेळा पाळा तसेच झोपेकडेही लक्ष द्या.

खाण्याच्या विकृती-

हल्ली झिरो फिगरचे वेड आहे. त्यासाठी क्षुधा अतिरेक या प्रकारात अनेक लोक विशेषतः स्रिया अन्न खाल्यानंतर ते अन्न अक्षरशः ओकून बाहेर काढतात.

तसेच मी जाड होऊ नये, म्हणून खाण्याच्या इच्छेचा अभाव असल्याने दिवस दिवस न खाता पिता राहणे हे मानसिक विकृतीचे लक्षण आहे.

व्यायाम/अतिव्यायाम-

 शरीराला झेपेल,पचेल असाच व्यायाम सर्वानी करावा,चालण्याचा व्यायाम सर्वोत्तम आहे,मा.मोदींनी सुद्धा किमान 2800 पाऊले रोज चालण्याचा सल्ला सर्वाना दिला आहे.

पालक- पालक पाल्य आंतरक्रिया व संबंध हलके फुलके असावे, कौटुंबिक वातावरण सकारात्मक व मोकळे ठेवण्याचा प्रयत्न पालकांनी करावा तसेच अंतरवैयक्तिक संबंध जोपासण्याचे शिक्षण मुलांना आवर्जून द्यावे. मुले पालकांनाच आदर्श मानत असतात. त्यामुळे पालकांमधील वर्तन कौशल्ये मुले शिकत असतात.

सामाजिक- वास्तविक स्व व आदर्श स्व यात तफावत नसावी, सामाजिक स्व चाही परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवर दिसून येतो,त्यामुळे समाजनेही व्यक्तीसोबत आंतरक्रिया करत असताना त्यांच्या स्व ला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी.

     सकारात्मक दृष्टीकोन-

ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे हे दृष्टिकोन सकारात्मक आहे की नकारात्मक यावर अवलंबून असते. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचारांच्या लोकांच्या सहवासात राहा,क्रोध,लोभ,द्वेष,मत्सर, काम स्वतः च्या नियंत्रण ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा.

वाचन -  व्यक्तीचरित्राचे वाचन केल्यास संघर्ष करण्यासाठी आत्मबळ विकसित होते,मनात संघर्ष पचवण्याची ताकद निर्माण होते, आपल्याकडे आशा अनेक संघर्षशील व्यक्तीचे चरित्रे उपलब्ध आहेत,त्याचा फायदा करून घ्या. उदा. डॉ.कलाम, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.शरद पवार आदि.

 क्रियेला प्रतिक्रिया या व्यक्तीच्या बोधनावर अलंबून असतात, बोधनाचे विचार-भावना-कृती हे तीन अंग आहेत या पद्धतीने आपण जीवन जगत असतो.त्यामुळे सामाजिक कार्यात आवर्जून सक्रिय सहभाग नोंदवा यामुळे स्व आदर वाढायला मदत होते. ध्येयपूर्ण जीवन जगा.

भावना व्यक्त करा- व्यवस्थापन तज्ञ पेंनें बेकर यांच्या मानसशास्त्रीय संशोधनातील निष्कर्ष खूप महत्त्वाचा आहे, 'जे लोक भावना व्यक्त करतात ते नैराश्यात जात नाहीत',म्हणून आपल्या भावना जवळच्या विश्वासु व्यक्तीसोबत अथवा कोणत्याही मानसतज्ञांसोबत अगदी हेल्पलाईनद्वारे कॉलकरून सुद्धा भावना व्यक्त करण्याची संधी उपलब्ध आहेत,त्याचा उपयोग करुन घ्यावा कारण मनाचा  थेट संबंध शरीराशी आहे,तसाच शरीराचाही थेट संबंध मनाशी आहे,तो जर उत्तम,सकारात्मक असेल तर काळजीचे कारण नाही आणि तो जर तसा नसेल तर मात्र आजच मी ठणठणीत आहे या दिवास्वप्नातून लवकर बाहेर येण्यातानाच गरज आहे ते योग्य जीवनशैली चे नियोजन करण्याचे हे जितक्या लवकर लक्षात येईल तो सुदिनच ठरेल.

 श्री. योगेश कुलकर्णी

सहाय्यक प्राध्यापक व मानसशास्त्र विभाग प्रमुख,मराठे कॉलेज,राजापूर.

   मो.8007209727.

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

1 टिप्पणी(ण्या) :