Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

गणेशभक्तांच्या मार्गावर वाहतूक कोंडी


गणेशभक्तांच्या मार्गावर वाहतूक कोंडी

गणेशभक्तांच्या मार्गावर वाहतूक कोंडी



 गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांच्या मार्गात वाहतूक कोंडी आणि खड्यांचे विघ्न येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी सकाळपासून खारपाडा, नागोठणे, कोलाड, माणगाव दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यातील गणेशभक्त कोकणात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. खारपाडा, नागोठणे, वाकण, कोलाड, इंदापूर आणि माणगाव याठिकाणी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. दुसरीकडे महामार्गावरील खड्डे दुरुस्तीची मुदत संपली तरी खड्डे दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झाले नव्हते. ठिकठिकाणी पडलेल्या खड्यामुळेही वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहे.

मध्यरात्रीपासून कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना याचा प्रत्यय आला. वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने, महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. नागोठणे ते इंदापूर यापट्ट्यात अत्यंत धिम्यागतीने वाहतूक सुरू होती. पाच ते सहा किलोमिटरचे अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागत होता. त्यामुळे रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतुकीचे नियमन सुरळीत राहवे म्हणून वाहतूक पोलीस कसोशीने प्रयत्न करत होते. पण वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यात फारसे यश येत नव्हते.

अरुंद रस्ते, भरमसाठ खड्डे, बेशिस्त वाहन चालक या समस्येत अधिकच भर घालत होते. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना सध्या प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे इंदापूर ते पळस्पे दरम्यान ठिकठिकाणी वळण रस्ते (डायव्हर्जन्स) देण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावत होता.

अवजड वाहने रस्त्यावरच….. 

गणेशोत्सवाच्या पाश्र्वाभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही अनेक मालवाहतूक करणारे ट्रक, केमिकल टँकर्स मोठ्या प्रमाणात रस्त्यावर होते. या वाहनांना नियमन करण्यात वाहतूक पोलिसांना अपयश आल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीची समस्या अधिकच बिकट होत होती.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जवळपास दोन हजार एसटी बसेस आणि तितक्याच खासगी बसेस मुंबईतून कोकणाच्या दिशेने सोडल्या आहेत. त्यामुळे वाहनांचे योग्य नियमन करणे गरजेचे होते. ८ सप्टेंबरला सर्वाधिक वाहने कोकणच्या दिशेने निघणार याची पूर्व कल्पना प्रशासकीय यंत्रणांना होती. त्यामुळे अवजड वाहनांना थोपविणे गरजेचे होते. अपयश आल्याने महामार्गावर ठिकठिकाणी वाहने अडकून पडल्याचे दिसून आले.

कोंडीची कारणे

’ अरुंद रस्ता

’ महामार्ग रुंदीकरणाचे रखडलेले काम

’ बेशिस्त वाहन चालक

’ अवजड वाहतूक रोखण्यात अपयश

वाहनचालकांच्या आतताईपणा, आणि रस्त्याला पडलेले खड्डे यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे वाहतूक नियमन करून आता आम्ही एक एक वाहन पुढे सोडत आहोत. गणेश भक्तांचा प्रवास निर्विघ्न व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. – सुभाष जाधव, पोलीस  उपनिरीक्षक, कोलाड   

गेली १२ वर्षे रस्त्याचे काम रखडले आहे. कुठलाच राजकीय पक्ष याकडे लक्ष द्यायला तयार नाही, रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. साडेतीन तास आम्ही वाहतूक कोंडीत अडकलो आहोत. कधी गावी पोहोचू हे माहीत नाही.

..................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा