Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

कोरोनाच्या काळातही शिक्षकांची सामाजिक बांधिलकी आणि नाविण्यपूर्णतेला सलाम

 
कोरोनाच्या काळातही शिक्षकांची सामाजिक बांधिलकी आणि नाविण्यपूर्णतेला सलाम


समाजसेवक श्री. रामचंद्र दळवी यांच्या तर्फे शिक्षक गौरव पुरस्काराची घोषणा.

रत्नागिरी : ज्या शिक्षकांनी जागतिक महामारी (कोव्हिड-१९) च्या काळातही निरंतर शिक्षणकार्य केले आणि नवकल्पना राबवित असंख्य विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जन सुरू ठेवले अशा शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. समाजसेवक आणि एस.आर. दळवी (आय) फाऊंडेशनचे सहसंस्थापक श्री. रामचंद्र दळवी (आबा) यांच्या वतीने सदर शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे.

 खाली नमूद केलल्या विविध श्रेणींमध्ये सदर पुरस्कारांचे वितरण केले जाईल.

1.नाविण्यपूर्ण शिक्षक- प्राथमिक विभाग (इय़त्ता १ ली ते इयत्ता ७ वी)

2.नाविण्यपूर्ण शिक्षक- माध्यमिक विभाग (इयत्ता ८ वी ते १२ वी)

3.नाविण्यपूर्ण प्राध्यापक- महाविद्यालयीन पदवी विभाग

 4. नाविण्यपूर्ण प्राध्यापक - अभियांत्रिकी महाविद्यालय

5.नाविण्यपूर्ण प्राध्यापक- व्यवस्थापन महाविद्यालय

6. नाविण्यपूर्ण प्राध्यापक- वैद्यकीय महाविद्यालय


विद्यार्थी हितासाठी महामारीच्या काळात केलेले नाविण्यपूर्ण कार्याचे छायाचित्र किंवा ध्वनीमुद्रण(व्हिडीओ) सह केवळ २०० शब्दांमध्ये टीचर्स टॉक ( TCHRTalk) या ऍपद्वारे  सादर करावे. शिक्षकांनीही याच ऍपद्वारे वरील अटीसह नामांकन भरणे आवश्यक आहे. या प्रत्येक श्रेणीमधून प्रत्येकी दोन शिक्षकांची निवड सदर पुरस्कारासाठी केली जाणार आहे.

३० सप्टेंबर, २०२१ पूर्वी नामांकन सादर करणे आवश्यक आहे. आपल्या सहशिक्षकाला पुरस्कार मिळावा यांसाठी संपूर्ण राज्यातील शाळा तसेच महाविद्यालयांतील इतर शिक्षकांनी यासाठी मतदान करता येणार आहे. टीचर्स टॉक ( TCHRTalk) या ऍपद्वारे मतदान करता येईल. शिक्षकांच्या मतदानाला ९० ट्क्के गुण तर पुरस्कार निवड समितीचे मत १० टक्के विचारात घेतले जाणार आहे. 

७ ऑक्टोबर  रोजी  या पुरस्कारप्राप्त शिक्षकांची नावे मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात जाहिर केली जातील.

 “ग्रामीण भागात ज्या ठिकाणी तांत्रिक सहाय्य देणे परवडत नाही अशा ठिकाणी अनेक शिक्षकांनी ज्ञानार्जनाचे काम अविरतपणे सुरू ठेवले आहे. अशा कठिण प्रसंगी शिक्षकांनी केलेल्या योगदानाचे यथोचित कौतुक व्हावे, त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशानेच हे पुरस्कार देण्याचे योजले आहे“ असे समाजसेवक आणि एस. आर.दळवी(आय) फाऊंडेशनचे सहसंस्थापक श्री. रामचंद्र दळवी म्हणाले.  

 “समाजाच्या उभारणीचा पाया रचण्याचे काम शिक्षक करत असतात. ५ ट्रिलीयन डॉलर्स अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठीचा नवीन भारताचा आधारस्तंभ असेच या शिक्षकांना संबोधले पाहिजे. “ असे श्री. दळवी पुढे म्हणाले.

मार्च २०२० पासून देशाव्यापी ताळेबंद (लॉकडाऊन) जाहिर झाला त्याबरोबर शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे आदेश जाहिर झाले. त्यामुळे तांत्रिक उपाय शोधत शिक्षणात सातत्य सुनिश्चित करण्यासाठी पायाभूत सुविधा सुधारण्याची तातडीने गरज निर्माण झाली. अचानक उद्भवलेलेल्या या परिस्थितीतही शिक्षकांनी धैर्याने सामना केला आणि असंख्य अडथळे पार करत, ज्ञानार्जन सुरूच ठेवले त्यासाठी अनेक शिक्षकांनी नाविण्यपूर्ण उपक्रम, तंत्रपद्धतींचा वापर केला आहे त्यामुळे विद्यार्थांसमोरील शिक्षणाबाबतीतले अडथळे दूर होण्यास मदत झाली आहे.

टीचर्स टॉक (TCHRTalk)  ऍप विषयी महत्त्वाचे-

टीचर्स टॉक (TCHRTalk) हे एक असाधारण ऍप्लीकेशन आहे जे शिक्षक आणि त्यांच्या सहशिक्षकांना जोडण्यासाठीचे व्यासपीठ आहे. या ऍपद्वारे मतमतांतरांची देवाणघेवाण, अडचणी सामायिक (शेअर) करण्यासोबतच त्या सोडविण्यासाठी मदत होऊ शकते. याशिवाय शिक्षण क्षेत्रांतील विविध रोजगार संधी आणि शिक्षण समुदायाच्या बळकटीकरण्यासाठी तसेच शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी हे ऍप गुगल प्लेस्टोअर्सवर उपलब्ध असून तेथून डाऊनलोड करणे शक्य आहे.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा