Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

 काव्यपुष्प

---------------------------------------
    याद

धुंद चांदण्यात जरी रातराणी बहरली                

एकांताच्या प्रणयाला  गुलाबाची याद आली...                           

            नंदिनी देव पुणे

---------------------------------------------------

 मन कळलं की

एकदा राधा म्हणाली कान्हाला

दिसतं तसं नसतं

म्हणूनच जग फसतं..

अन् कान्हा, तुला वाटतं तितकं 

माणसं समजणं सोप्पं नसतं..!


हे ऐकुन कान्हा

गालातल्या गालात हसला

पळभरापुरता

कदंबाखाली बसला

राधेला वाटलं 

कान्हा आता फसला

पण 

फसेल तर तो कान्हा कसला...!


नजरेला नजर भिडली

बंधने सारी गळून पडली

ज्ञानाची दारे उघडली


अखेर म्हणाला कान्हा


त्यात काय कठीण असतं..?

डोळे वाचायला जमलं

की मन समजायला

सोप्पं जातं!

आणि एकदा मन कळलं की

आपोआपच माणूस समजतं..


कंबरेची बासुरी आता

ओठांवरती स्थिरावली

आणि निमिषार्धात

गुंजल्या आसमंती

लक्ष लक्ष स्वरावली


त्या स्वर्गीय सप्तसुरांनी

वेडी राधा बावरली

कान्हानं तिला सावरली

भानावर येताच विचारलं


राधे आता तरी पटलं का?

माझं म्हणणं खरं वाटलं का?

कुणी सांगितलं तुला..

माणूस समजणं कठीण असतं

अगं, खरंच तसं नसतं

डोळे वाचायला जमलं

की मन समजायला

सोप्पं जातं...

आणि एकदा मन कळलं की

आपोआपच माणूस समजतं..!!


अरूण मोर्ये

सत्कोंडी रत्नागिरी

८८०६८९०५५८

----------------------------------

 देव जागवितो

पहाट प्रहरी

नाम त्याचे

राम कृष्ण हरी!


कृष्णा

--------------------------------------------------

...पद....

 पद पद काय असतय दोन दिवसाचा खेळ 

पदाला धरून कवटाळलय तर बसत नाही मेळ

पदावर बसल्यानंतर मिळतो मोठा मान

आठवा त्याच्याआधी किती सहन केला अपमान  ।1। 

 पदा पूर्वीचे दिवस आठवूण वागावे सर्वांशी                    

आपल्यालाही मान मर्तबा मिळतो मग सगळ्यांशी 

 पद आल्यावर कोणी न  छोटा नसे कोणी मोठा 

 पण पद पद मिरवून स्वतःच होई मोठा   ।2।  

आपणही होतो सगळ्यांसारखे येण्यापूर्वी पद 

आता सगळे आठवून बघ ना किती घातले वाद

पद हे नसते कधी अढळ ठेवा याचे भान 

सहकाऱ्यांशी कसे वागावे ठेवून आपला मान   ।3।

पदावरून जाणार आपण नियत वयोमानानुसार गेल्यानंतर 

आठवण येईल असे ठेवा मनी बहार 

जेवढा मिळे मान येथे ठेवा त्याची जाण 

घरी न कोणी पुसती तेव्हा वाटे नोकरी छान   ।4।

    

  कवयित्री  :  मेहमूदा शेख.

-------------------------------------------


       देवा!


शिकव देवा शिकव

संयम मला शिकव

शिस्तबद्ध शिकण्याचे

शिक्षण माझे पिकव!१


दाखव देवा दाखव

चांगले मला दाखव

चांगले तेच बघण्याची

गोडी मला चाखव!२


हसव देवा हसव

संकटात मला हसव

दोन हात संकटाशी

कर मला कासव!३


पाठव देवा पाठव

चांगली संगती पाठव

सत्संग देऊन मला

अज्ञान सारे आटव!४


सावर देवा सावर

मोहमाया माझी सावर

भावनांना लगाम घालीत

वेळीच त्यांना आवर!५


श्री.कृष्णा दामोदर शिंदे.


-------------------------------------

शामलाक्षरी

धार

धार  पात्याची वाराने

 रक्तबंबाळ शरीर

धार संतंत पाऊस

जनजीवन अस्थिर ॥

धार = हत्याराची , पावसाची


सौ.शामला पंडित(दीक्षित )

प्रणाली प्रकाशन, चिंचवड

------------------------------------

सृष्टी

सूर्य स्वागता

कळ्यांची फुले झाली

हस-या गाली


सोनेरी छटा

आकाशी झळकली

सृष्टी लाजली


चैतन्य छाया

धरेवर पडली

कार्ये उरली


सौ उषा राऊत

------------------------------------------

 शब्दगंध..

सुबक मूर्ती शिकवून गेली

शेवटी उरणार "माती"*

एकमेकांत विरघळाल तर 

घट्ट होतील "नाती"....*


सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )

पुणे.

--------------------------------------

 ज़िंदगी राज़ रखता हूं...


छोटी आँखों  में समंदर  रखता  हूँ।

रेत  पर  अपना नाम  लिखता   हूँ।


इन लहरों का  किनारों पर आकर 

टकराने का भी  हिसाब  रखता हूँ।


अकेला   जरूर   हूँ   फिर  भी में 

हर नज़र में एक आहट  रखता हूँ।


मुस्कुराते  चेहरे  पर  गौर से देखो

में भी अपने अंदर जान  रखता हूँ।


ऐसे ही में अपना  ख्याल रखता हूँ।

अपनी ज़िंदगी एक राज़ रखता हूँ।


  नीक  राजपूत

  9898693535

------------------------------------

     आजची चारोळी

जन्म -मृत्यूचा फेरा

अपरिहार्य असतो

माहित असुनही माणूस

मोह- मायाजालात फसतो


  सौ. हेमा जाधव, सातारा

----------------------------------

आईबाप!

कर्तव्य तत्पर

आई माझी साधी

उठायची आधी

रामपारी  १


सडा सारवण

झाडलोट करी

पाणी पिण्या भरी

मडक्यात  २


भांडीकुंडी घासी

धुणं धुतानाही

दोन्ही हातानांही

चैन नसे  ३


अंघोळीचं पाणी

ठेवी चुलीवर

धूर घरभर

व्हायचा हो  ४


अंघोळीस असे

बस्तराची न्हाणी

हौदातलं पाणी

इस्नायला  ५


सफाई धुलाई

रोज नियमित

घाण अजिबात

नसायची  ६


आईचा आवाज

लई कणखर

घाम दरदर

फोडायची  ७


बिनदुधाचाच

चहा इस्टूवर 

कोरा वाटीभर

ओतायची ८


बापाची ती पूजा

चाले तासभर

भस्म कोसभर

फासायचा ९


स्तवन रामाचे

गीता रामरक्षा

देहाची सुरक्षा

मागायचा १०


तांब्याभर पाणी

तुळशीस घाली

प्रदक्षिणा घाली

तुळशीला ११


नमन सूर्याला

हात ते जोडून

डोळेही झाकून

मनोभावे१२


धोतराचा सोगा

खोवी पाठीमागे 

आम्हासाठी मागे

आशिर्वाद  १३


आई ती रूक्मिणी 

बाप पांडूरंग

धार्मिकता अंग

दोघांनाही १४


गरीबी लक्तरे

नशीबी टांगली

आता ती फांगली

पुण्याईने १५


जन्मदाते देव

कृष्णा म्हणे जना

आईबापाविणा

स्वर्ग नाही १६

श्री.कृष्णा दामोदर शिंदे.

-----------------------------------

एकांत


कोणाच्या दुःखात, कोणाच्या सुखात 

मधल्यामध्ये माझे मी पण हरवून गेले 


प्रेमाच्या छायेत, मायेच्या वासलात 

असलेले भान कुठेतरी हरपून गेले 


हृदयाच्या कोपऱ्यात, मनाच्या गाभाऱ्यात 

विचारांचे माणिक रत्ने एकाकी मोडून गेले 


गुंतल्या श्वासात, खोट्या प्रेम बंधनात

रक्तातील नात्यांचे धागेदोरे सुटुन गेले 


कोणासाठी तरी, मांडलेल्या डावात

कोणीतरी मलाच अडकवून गेले


अंधविश्वासात, परकियांच्या दबावात

मन माझे वेडे ते अकारण रमून गेले 


एकांतवासात, स्वप्नांच्या दृष्टिक्षेपात

मात्र निवांत होते जगायचे राहून गेले


- नयन धारणकर

----------------------------------------

 शब्दगंध..


गुलाबाचे फूल मातीत उगवते 

फुल उमलताना रुजावे लागते 

तसेच मनुष्याचे आयुष्य देखील 

चमकण्याआधी झगडावे लागते 


✍️सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )

पुणे.

---------------------------

किर्ती.... 

सुगंधापरी केवड्याच्या

चोहिकडे पसरावी किर्ती

उगाच नसावं आपलं

ओझ या धरती.....

 सौ.मेहमूदा शेख.(देहूगाव)

-----------------------------------

 तटस्थ

तुझ्या गाभाऱ्यातील 

सात्त्विक शांततेचा

चुराडा करून 

काल काही नराधमांनी

लचके तोडले तिच्या सर्वांगाचे

आपल्या वासनांध नखांनी

ओरबाडून काढली 

तिची अब्रू....

ती ओरडत राहिली

विव्हळत राहिली

अगतिक होऊन

टाहो फोडून सोसत राहिली

देशी विदेशी मद्याचा दर्प

आणि

रक्तात माखलेले

मरणांतीक क्षण...!


तू

 मात्र हे सारे

पहात होतास

ऐकत होतास

तटस्थपणे...!

तू सुसज्ज होतास

विविध शस्त्रांनी युक्त

पण का कुणास ठाऊक?

तुझ्या हातातली शस्त्र 

गळून पडली होती

की त्याची धार

बोथट झाली होती

तुलाच ठाऊक ? 

पण एक मात्र खरं

तू तुझ्या, 

संकटमोचक ..

तारणहार..

कृपासिंधु..

दयाघन..

वगैरे वगैरे..

या नावाला 

जागला नाहीस...

त्या हैवानी वासनांध वृत्तीचा

आणि 

तुझ्या निष्क्रीय दगड होवून पडण्याचा

परिणाम पाहिलास ना?

एक निरपराध कोवळ्या कळीचा बळी!


काल तू निष्क्रीय होतास

आणि आज मी...

देवळाच्या कानाकोप-यात

लावलेल्या सीसीटीव्हीत

कैद झालेला हा थरार

मी अस्पष्ट करून

व्हायरल करतोय

टिव्हीवर.. इंटरनेटवर

आणि मग,

मेणबत्त्या..

श्रद्धांजली..

दुखवटे..

वगैरे वगैरे.. 

सा-या औपचारिकता 

पार पाडल्यावर

मनावरचं ओझं कमी झाल्यागत

निर्माण झाली भावना

जबाबदारीतून मुक्त झाल्याची...!

दोघांच्यातही..

तुझ्यात आणि माझ्यात!

आता,

तू शांतपणे दर्शन देतोयस  

तुझ्या भक्तांना..

आणि

मी गप्पा मारतोय

श्लील अश्लीलतेच्या

षंढपणे...

कुठल्याशा संस्कृतीचा बुरखा पांघरून..

निर्विकारपणे!


 अरूण मोर्ये

सत्कोंडी, रत्नागिरी

८८०६८९०५५८

-------------------------------------------

अभी का हाल...

हवा का झोंका  पूछ रहा है हमारा हाल।

उसे क्या बताऊ मेनें ख़ुद किया ये हाल।


आँसुओ  की  बूंदें चंद गिरी लेकिन मेरे

टुकड़े हुए हज़ार ऐसा है अभी का हाल।


जिस पत्थर  को दिलो जान से ज़िंदगी 

भर चाहा वही बिगाड़  गया  मेरा हाल।


कुछ सवाल दिलमें ऐसे उतरे की जिना

हुआ दुश्वार अब कैसे कहे अपना हाल।


अपने तो सब सो रहें है एक मौसम ही

है जो हर  कदम  पर पूछ  रहा है हाल।


   नीक राजपूत

   9898693535


---------------------------------

निसर्ग

निसर्ग दारी

आनंदाच्या लहरी

शुभ प्रहरी


गंधित वारा

मंद मंद वाहतो

गुढ सांगतो


हसून धरा

पिते सूर्य किरणे

मुक्त फिरणे


सौ उषा राऊत

-----------------------------

 पंख..

पंख असते, पक्षा प्रमाणे,

होऊन आठवणीवर  स्वार 

फिरून येईन मनात  माझ्या 

हितगुज होई  फार 


पंखांनी घेऊन भरारी

कल्पने वरती स्वार होऊ

शब्द सुमनानी फुले उधळू

भावनांना गुंफून नेऊ


तत्परतेने झेप घेण्यास

पंखा मध्ये असे आत्मबळ

संकटाशी सामना करण्यास

मनातून मिळते पाठबळ


बनवून स्वप्न पंखाना

उंच आकाशी उडावे

सत्कर्माच्या वाटेवर

उंच शिखर गाठावे...


सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )

पुणे.

-------------------------------------

 पत्थर की ताक़त


मीठे लोगों की  कड़वी जुबान  जानता हूँ।

आईना हूँ सही गलत का फर्क  जानता हूँ।


टूट कर बिखरना जानता  हूँ पत्थर  दिल 

हूँ    पत्थर की   ताकत  भी   जानता   हूँ।


झूठ  बोलकर  मन   बहलाता  हूँ   रंगीन 

आँखोंमें भी दर्द होते है ये बात जानता हूँ।


में भी  इंसान हूँ  किसी  के  पास  रहेकर

ख़ुद से दूर  होने  की सज़ा भी जानता हूँ।


सुबह  की  भागदौड़  भरी  ज़िंदगी  शाम 

होते ही मेरी तबाही का आलम जानता हूँ।


हमारे बीच जो है मिलो की दुरियाँ जनता

हूं शहर से गाँव तक का  अंतर जानता हूँ।


    नीक राजपूत

    9898693535

--------------------------

साहित्य सेवा...

अभंग प्रकार

साहित्य लेखन/ करूया आपण

स्वतःचे लेखन,/ लिहू आम्ही//


विविध प्रकार/अवगत  करू/

साहित्यात राहू/ वृद्धी गत //


मांडू लेखणीत/समाजाची व्यथा/

अत्याचारी गाथा/ घडलेली/


शब्दांची किमया/ लेखणीत धार/

उचलू या वर/ समस्येला//


साहित्य क्षेत्रात/ शब्दांचीही माळ/

साहित्यिक बळ/संचारते//


उचलूनी पेन/ रुपी तलवार/

सपासप वार/ कुप्रथेला//


साहित्य संस्कृती/ चालवू वारसा/

वाव ना फारसा/ साहित्यिक/


संगीता वाल्मीक रामटेके गडचिरोली

मो.९४२३६०४१४०


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा