Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

चिपळूण तालुका विज्ञान शिक्षक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान सुपर परफॉर्मन्स परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न





 चिपळूण तालुका विज्ञान शिक्षक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान सुपर परफॉर्मन्स परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न


रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ व एमकेसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एसएससी विज्ञान सुपर परफॉर्मन्स परीक्षांचा पारितोषिक वितरण समारंभ इंग्लिश मीडियम स्कूल डेरवण येथे नुकताच संपन्न झाला. 

याप्रसंगी एमकेसीएलचे समन्वयक  श्री.कोलते ,रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार , चिपळूण तालुका विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष  मोहन पाटीलयांच्या प्रमुख उपस्थितीत डेरवण इंग्लिश मिडीयम च्या शिक्षण संचालिका शरयू यशवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालयाचे विज्ञान विभागप्रमुख श्री. जुवेकर , मुख्याध्यापिका परकार मॅडम व विज्ञान शिक्षिका चाळके मॅडम यांच्या नियोजनाने सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत पारितोषिक  वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते . 

यावेळी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थी अद्वैत पाटील व तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनी दीक्षा वैद्य यांचा एमकेसीएल व चिपळूण तालुका विज्ञान शिक्षक मंडळामार्फत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 10,000 व तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थीनीला 5000 रुपयांचा धनादेश ,पुष्पगुच्छ,  सन्मानपत्र वस्तुरूप बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला .

यावेळी चिपळूण तालुका विज्ञान शिक्षक मंडळाचे उपाध्यक्ष पाग विद्यालयाचे मुख्याध्यापक शैलेश सुर्वे , चिपळूण तालुका विज्ञान शिक्षक मंडळाचे  पदाधिकारी प्रमोद चीप्रिकर  (मोरवणे हायस्कूल ) , ज्ञानेश्वर नाझरे  ( ओवळी नांदीवसे हायस्कूल ),  वसंत यादव  (कोसबी -फुरुस हायस्कूल ), प्रीतम विचारे (असुर्डे हायस्कूल )आसावरी राजेशिर्के   (निवळी हायस्कूल )तसेच अमरजीत चव्हाण स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळकृष्ण चव्हाण हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते या सर्वांच्या हस्ते यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा व डेरवण विद्यालयातील सन्माननीय आयोजकांचा  सत्कार करण्यात आला.कार्यक्रम प्रशस्त हॉलमध्ये , महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाचे सर्व नियम पाळून विद्यालयात सर्व शिक्षकांचे उपस्थित आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे अध्यापक  तांबे सर यांनी सुरेख पद्धतीने केले होते .कोविडच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्वांना निमंत्रण देता येत नाही याबद्दल चिपळूण तालुका विज्ञान शिक्षक मंडळ मंडळाचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे .या परीक्षेसाठी १५००० हून अधिक विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.

.........
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा