Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

जागतिक पर्यटन नकाशावर रत्नागिरीचे स्थान निर्माण करू : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील


जागतिक पर्यटन नकाशावर रत्नागिरीचे स्थान निर्माण करू : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील


 रत्नागिरी : रत्नागिरी निसर्गरम्य जिल्हा असून येथे पर्यटनवाढीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा पर्यटनदृष्ट्या जगाच्या पाठीवर नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले. हॉटेल व्यंटेश येथे जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेचे राजू भाटलेकर, माजी आमदार बाळ माने, रमेश कीर, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर केशव कुमार, इन्फिगो आय केअर सेंटरचे डॉ. श्रीधर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्याला समुद्रकिनारा, सह्याद्री पर्वतांच्या रांगा, पुरातन धार्मिक स्थळे, कातळशिल्प, रुचकर अन्नपदार्थ, आंबा, काजू आदी फळांपासून बनविलेली विविध उत्पादने आदी पर्यटनवाढीसाठी आवश्यक गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. पर्यटकांना त्यांच्या आवडी-निवडीनुसार पर्यटनाच्या दृष्टीने वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. येथे तयार करण्यात होणाऱ्या उत्पादनाचा खप वाढण्यासाठी येथील उत्पादनांची ब्रँडिंग होणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पर्यटनवाढीसाठी कनेक्टिव्हिटी फार महत्त्वाची असून ती वाढविण्यासाठी येथील विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. येथील पर्यटनाबाबतची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी टुरिझम डॅशबोर्ड तयार करणे आवश्यक आहे. त्यावर येथील कृषी उत्पादने, घरगुती उत्पादने, त्यांचे संपर्क क्रमांक आदींची माहिती असेल. या माध्यमातूनदेखील जिल्ह्यातील पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत होईल आणि जिल्हा टुरिस्ट हब म्हणून विकसित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा