
महाराष्ट्रात काल विक्रमी लसीकरण; १५ लाखांहून अधिक लस मात्रा पूर्ण
महाराष्ट्रात करोना लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग घेतल्याचं चित्र आता दिसून येत आहे. लसीकरणात कायमच आघाडीवर राहिलेल्या महाराष्ट्राने एका दिवसात विक्रमी लसीकरण पूर्ण केलं आहे. कालच्या एकाच दिवसात राज्यात १५ लाखांहून अधिक नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत काल राज्यात एकाच दिवसात १५ लाखांपेक्षा अधिक लस मात्रा दिल्या असून लसीकरणाचा नवा विक्रम महाराष्ट्राने नोंदवला आहे. बुधवार ८ सप्टेंबर रोजी दिवसभरात १५ लाख ३ हजार ९५९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.
राज्यात २१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६५, तर ४ सप्टेंबर रोजी १२ लाख २७ हजार २२४ नागरिकांचे लसीकरण झाले. हा विक्रम बुधवारी मागे टाकण्यात आला. आरोग्य यंत्रणेतील सर्व घटक लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
एक दृष्टिक्षेप…
- १८ पेक्षा अधिक वयोगटातील एक मात्रा घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण : ४८.४६ टक्के
- १८ ते ४४ वयोगटातील एक मात्रा घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण : ३७.८८ टक्के
- ४५ पेक्षा अधिक वयाच्या एक मात्रा घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण : ५२.२४ टक्के
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा