Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रत्नागिरी येथील कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, रत्नागिरी उपकेंद्राचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन


 रत्नागिरी येथील कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, रत्नागिरी उपकेंद्राचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन


रत्नागिरी प्रतिनिधी:-

वादाचे उत्तर वेदांमध्ये असते. वेद शिकण्यासाठी संस्कृत शिकावे. संस्कृत भाषा शिकल्याने संस्कृती कळते. चांगले संस्कार मिळतात. माणूस म्हणून आपण कसे वेगळे आहोत हे संस्कृतमधून समजते. त्यामुळे आपण सर्वांनीच संस्कृत भाषा शिकली पाहिजे. संस्कृत जागवल पाहिजे. त्यामुळे आगामी काळात रत्नागिरीतील या संस्कृत विद्यापीठाला जी काही मदत लागेल ती सरकार म्हणून करु असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी आयोजीत ऑनलाईन कार्यक्रमात केले. 

कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्व विद्यालय, रामटेक रत्नागिरी उप केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी संस्कृत बद्दलचे आपले मत व्यक्त केले. 

या कार्यक्रावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे अध्यक्ष, प्रा.श्रीनिवास वरखेडी, रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ.दिनकर मराठे, डॉ. संजय जगताप, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, रामचंद्र जोशी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, प्राचार्य सुधिर सुखटणकर, अॅड.विलास पाटणे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ, नगरसेविका रशिदा गोदड, शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर, प्रा.मलुष्टे, प्रांताधिकारी सुर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थीत होते.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आपल्या भाषणात म्हणाले की रत्नागिरी छ.शिवाजी महाराजांवर आधारित रिसर्च सेंटर सुरु करणार आहोत. या वर्षी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करणार आहोत. त्यामूळे पुढच्या वर्षी पीपीपी मॉडेलवर आधारित मेडिकल कॉलेज सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी संबंधीत प्रशासनाला द्यावेत असे मत व्यक्त केले.

.........
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा