Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

समुपदेशनातून गुन्हेगारी नियंत्रणाचे प्रयत्न!


समुपदेशनातून गुन्हेगारी नियंत्रणाचे प्रयत्न!

समुपदेशनातून गुन्हेगारी नियंत्रणाचे प्रयत्न!



एका पोलिसावर दोन सराईत गुन्हेगारांची जबाबदारी


 जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे. जिल्ह्यच्या सीमा ८ जिल्ह्यंशी जोडल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगार येण्याचे प्रमाण मोठे आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पोलीस ठाण्याच्या एका कर्मचाऱ्याकडे दोन सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे. वरिष्ठ अधिकारी दर पंधरा दिवसांनी त्याचा आढावा घेतील. एखाद्या चुकीमुळे गुन्हा केलेल्यांचे समुपदेशन करून त्यांना गुन्हेगारीपासून प्रवृत्त करण्याचे काम पोलिस करणार आहेत. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्या संकल्पनेतून ही नवी योजना जिल्ह्यत राबवली जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शेखर यांनी आज, शनिवारी जिल्ह्यतील पोलिस अधिकाऱ्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व दीपाली काळे आदी उपस्थित होते.

पोलिसांच्या कामात लोकसहभाग वाढवणार असल्याचेही डॉ. शेखर यांनी स्पष्ट केले. अवैध सावकार शेतकऱ्यांसह नागरिकांना लुटत असल्याच्या घटना वाढत आहेत, याकडे लक्ष वेधले असता डॉ. शेखर म्हणाले,की नागरिकांनी सावकारांविरुद्ध तक्रारी कराव्यात, अशा सावकारांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.

घरगुती हिंसाचार, घटस्फोट अशा घटना वाढत आहेत. पोलिसांच्या समुपदेशन कक्षाच्या माध्यमातून या घटनांना आळा घालण्यासाठी, पती—पत्नीमधील वाद मिटवून त्यांची एकमेकांपासून विभक्त होण्यापर्यंत त्यांची मानसिकता जाणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘टू—प्लस’ योजना व्यापक स्वरूपात राबवणार

सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ‘टू—प्लस’ योजना सुरू केली आहे. या योजनेचे कौतुक विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर यांनी केले. या योजनेत आणखीन काही बाबींचा समावेश करून तसेच अन्य अधिकाऱ्यांच्या सूचनांचा समावेश करून ही योजना व्यापक प्रमाणात राबवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

‘सायबर क्राईम’ प्रतिबंधासाठी जनजागृती मोहीम

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘सायबर क्राईम’ स्वरूपाचे गुन्हे वाढत आहेत. यामागे संघटित गुन्हेगार असल्याचेही निष्पन्न होत आहे. परराज्यात कुठेतरी बसून हे गुन्हेगार अन्य ठिकाणी गुन्हे करतात. त्यांच्या शोधासाठी पोलिस गेले तरी ते सहज आढळत नाहीत. त्यामुळे नागरिकांची अशा गुन्ह्यतून फसवणूक होऊ नये, यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. पोलिसांच्या ‘सायबर सेल’च्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवणार असल्याचे महानिरीक्षक शेखर यांनी सांगितले.


................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा