Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राज्याच्या महसुलात घट


राज्याच्या महसुलात घट

राज्याच्या महसुलात घट

महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये वस्तू व सेवा करापोटी १५,१७५ कोटी रुपये संकलित झाले.


राज्यात वस्तू व सेवा करातून मिळणाऱ्या उत्पन्नात जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये ३,७२४ कोटींनी घट नोंदविण्यात आली. दुसरीकडे, चालू आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत दस्त नोंदणीत घट झाल्याने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल ३,६३४.६७ कोटींच्या तुटीचा सामना करावा लागला. राज्याचा महसूल आटल्याने निर्बंध शिथिल होऊनही अर्थचक्र अद्यापही रुळावर आलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

वस्तू  व  सेवाकर : ३,७२४ कोटींनी आटला

 देशात वस्तू व सेवा कराची (जीएसटी) सर्वाधिक वसुली होणाऱ्या महाराष्ट्रात जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये वसुली ३,७२४ कोटी रुपयांनी घटली.

महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये वस्तू व सेवा करापोटी १५,१७५ कोटी रुपये संकलित झाले. ऑगस्ट २०२०च्या तुलनेत ही वाढ ३१ टक्के  अधिक आहे. परंतु, गेल्या वर्षी या काळात करोनाचे निर्बंध कठोर होते आणि अनेक व्यवहार बंद होते. याउलट यंदाच्या जुलै महिन्यात राज्यात १८,८९९ कोटींची वसुली झाली होती. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधील करसंकलन ३,७२४ कोटींनी घटले. ऑगस्टमध्ये  राज्यातील अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आणि बहुतांश व्यवहारही सुरू झाले होते. मात्र, अर्थचक्र  अद्याप रुळावर आलेले नाही, हेच या आकडेवारीवरून स्पष्ट होते, असे मत राज्य शासनातील उच्चपदस्थांकडून व्यक्त करण्यात आले.  देशात सर्वाधिक वस्तू व सेवा कर संकलन महाराष्ट्रात होते. या पाठोपाठ गुजरात (७,५५६ कोटी), कर्नाटक (७,४२९ कोटी) आणि तमिळनाडू (७,०६० कोटी) या राज्यांमध्ये करसंकलन झाले. उत्तर प्रदेशात ५,९४६ कोटी करसंकलन झाले.

’जुलै महिन्यात राज्याचे जीएसटी संकलन १८,८९९ कोटी होते. ऑगस्टमध्ये अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, त्या महिन्यात ‘जीएसटी’ संकलनात घट नोंदविण्यात आली.

मुद्रांक  शुल्क : ३,६३४.६७ कोटींची तूट

  चालू आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत दस्त नोंदणीत घट नोंदविण्यात आली. त्यामुळे या कालावधीत नोंदणी विभागाला मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांमधून १२ हजार ५०० कोटी रुपये मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८८६५.३३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला तब्बल ३,६३४.६७ कोटींची तूट आल्याचे स्पष्ट झाले आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला दरवर्षी महसूल गोळा करण्यासाठी उद्दिष्ट दिले जाते. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ३० हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार दर महिन्याला २५०० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळणे क्रमप्राप्त आहे. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत चालू आर्थिक वर्षात दिलेली नाही. त्यामुळे एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट अशा पाच महिन्यांत दस्त नोंदणीतही वाढ झालेली नाही. करोनामुळे सन २०२०-२१ हे आर्थिक वगळता त्या आधीच्या दोन आर्थिक वर्षांत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल गोळा के ला आहे. साधारणत: पहिल्या सहामाहीत विभागाला दिलेल्या उद्दिष्टापेक्षा निम्मे उत्पन्न प्राप्त होते. यंदा करोनामुळे सातत्याने लावण्यात येणारे निर्बंध, कोलमडलेली अर्थव्यवस्था, मोठ्या कि मतीचे नोंदवले न गेलेले व्यवहार आणि राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कात दिलेली सवलत वाढवण्यात न आल्याने चालू आर्थिक वर्षात उद्दिष्ट गाठताना कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुद्रांक शुल्कात तीन टक्के , तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत दोन टक्के  सवलत दिली होती. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुद्रांक शुल्क भरलेल्या नागरिकांना ३० एप्रिल २०२१ पर्यंत, तर ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरलेल्यांना ३१ जुलैपर्यंत दस्त नोंदणी करण्यास मुभा होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी होऊन बांधकाम क्षेत्रावरील मळभ काही प्रमाणात दूर होण्यास मदत झाली होती. परिणामी ही सवलत चालू आर्थिक वर्षातही सुरू ठेवण्याची मागणी होती. मात्र, राज्य सरकारने सवलत वाढवलेली नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम यंदा महसुलावर होत आहे.

करोना संसर्गामुळे निर्माण झालेली प्रतिकू ल परिस्थिती पाहता चालू आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत प्राप्त महसूल खूप कमी आहे, असे म्हणता येणार नाही. सध्या संगणकीय प्रणालीचे अद्ययावतीकरण सुरू असून दस्त नोंदणीतील अडथळे कमी होऊन उद्दिष्टपूर्ती होईल.  – श्रावण हर्डीकर, नोंदणी  महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक

....................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा