Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राजापूर तालुक्यातील ओणी-सौंदळ-खडीकोळवण-येळवण-रायपाटण-पाचल-कारवली-पांगरी-अणूस्कुरा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे

 राजापूर तालुक्यातील ओणी-सौंदळ-खडीकोळवण-येळवण-रायपाटण-पाचल-कारवली-पांगरी-अणूस्कुरा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे


कॉंग्रेस नेत्या  अ‍ॅड..हुस्नबानू खलिफे यांची मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे मागणी


रत्नागिरी प्रतिनिधी:-

काँग्रेस नेत्या व माजी विधान परिषद आमदार अ‍ॅड..हुस्नबानू खलिफे यांनी राजापूर तालुक्यातील ओणी-सौंदळ-खडीकोळवण-येळवण-रायपाटण-पाचल-कारवली-पांगरी-अणूस्कुरा या राज्य मार्गाचे  डांबरीकरण तात्काळ करण्यात यावे अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. विशेष रस्ता दुरुस्ती योजनेतून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या रस्त्याचे डांबरीकरण होईल अशी माहीती अ‍ॅड..हुस्नबानू खलिफे यांनी दिली आहे.

राजापूर तालुक्यातील ओणी-सौंदळ-खडीकोळवण-येळवण-रायपाटण-पाचल-कारवली-पांगरी-अणूस्कुरा या राज्य मार्गावर असंख्य खड्डे पडले असल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहनचालकांना वाहने चालवताना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. गाड्यांचेही मोठे नुकसान होत आहे. ही वाहनचालकांची समस्या अ‍ॅड हुस्नबानू खलिफे यांनी मंत्री अशोक चव्हाण यांच्यासमोर मांडली. सदर रस्त्याचे तात्काळ पुर्णत: डांबरीकरण अथवा दुरुस्ती होणे आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

...........
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा