Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी "दीपस्तंभ" पुरस्काराने सन्मानित


 राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी "दीपस्तंभ" पुरस्काराने सन्मानित


महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन  च्या वतीने पतसंस्था क्षेत्रात इतर संस्थाना आदर्श निर्माण व्हावा व त्यांचे कामकाज करण्यासाठी दिशादर्शक ठरावा या साठी "दीपस्तंभ" हा मानाचा पुरस्कार दिला जातो. येथील राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीने महाराष्ट्रातील सहकार चळवळीत पतसंस्था क्षेत्रात दीपस्तंभाप्रमाणे कार्य करून, पतसंस्था चळवळीला चांगली दिशा दिली आहे. त्यामुळे पतसंस्थेला मानाचा असा ''दीपस्तंभ'' पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. सदरचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच शिर्डी येथे संपन्न झाला. परंतु कोविड-१९ च्या महामारीमुळे सदर पुरस्कार वितरण सोहळ्याला संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहू न शकल्याने मेलद्वारे कळविण्यात आले.

संस्थेने सभासद, शेअर्स, निधी, ठेवी, कर्ज, गुंतवणुका, खेळते भागभांडवल यामध्ये सातत्यपूर्ण केलेली वाढ, थकबाकीचे अल्प प्रमाण, सीडी रेशो चे आदर्श प्रमाण, नेट एनपीए शून्य टक्के, सातत्याने संस्थेने मिळविलेला "अ" वर्ग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, संस्थेची प्रभावी वसुली यंत्रणा, संस्थेचे सहकार चळवळीसाठीचे योगदान, संस्थेने जपलेली सामाजिक बांधिलकी तसेच कोविड-१९ काळात सभासदांना दिलेली सेवा या निकषाच्या आधारे संस्थेला हा मानाचा ''दीपस्तंभ'' पुरस्कार मिळाला आहे.   

संस्थेचे अभ्यासू, संयमी पण प्रसंगी आक्रमक, कल्पक, करारी, धाडसी व योग्य निर्णय क्षमता असे बहुआयामी चतुरस्त्र नेतृत्व लाभलेले यशस्वी चेअरमन सन्मा. श्री. प्रकाश मांडवकर तितकीच संयमी व तोलामोलाची साथ देणारे व्हा. चेअरमन सन्मा. श्री. बाळकृष्ण तांबे व संचालक मंडळ यांनी सातत्याने सभासदांच्या हिताचे घेतलेले निर्णय व त्याची कर्मचारी वर्गाकडून केली जाणारी प्रभावी अंमलबजावणी यामुळेच संस्था नेहमी प्रगती पथावर काम करत आहे. संस्थेने ग्रामीण भागात काम करताना आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून व्यवसाय वृद्धीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे सलग दोन वर्ष मानाच्या अशा ''दीपस्तंभ'' पुरस्कारावर संस्था आपली मोहोर उमटवू शकली आहे. 

या यशाचे श्रेय संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक तसेच भविष्याचा वेध घेवून चेअरमन सन्मा. श्री. प्रकाश मांडवकर यांचे नेतृत्वाखाली कार्यमग्न असणारे संचालक मंडळ, स्थानिक कमिटी सदस्य, कर्ज वसुली अधिकारी श्री. श्रीकांत राघव, सर्व शाखांचे शाखाधिकारी, सर्व कर्मचारी, पिग्मी व आरडी एजंट, सीए श्री. एन.एन. पाटणकर, कायदेविषयक सल्लागार श्री. एस.एम.देसाई या सर्वांचे असल्याचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितेंद्र पाटकर  यांनी सांगितले. 

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांचेमार्फत सलग दुसऱ्या वर्षी  सहकार क्षेत्रातील मानाचा "दीपस्तंभ" पुरस्कार पटकावल्याबद्दल राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

...............
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा