Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

खाद्यतेलासह शेंगदाणा, पोहे महागले

 

खाद्यतेलासह शेंगदाणा, पोहे महागले

खाद्यतेलासह शेंगदाणा, पोहे महागले

सणांमुळे मागणी अधिक; आवक घटल्याने दरवाढ


गौरी-गणपतीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत असली, तरी ग्राहकांना महागाईच्या तीव्र झळांना तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा दर साडेआठशे रुपये झाला आहे आणि त्याबरोबरच शेंगदाणा, खाद्यतेलाचे दर भडकले असून पोहे, रवा, मैदा, आटा, जाड रवा (सुजी) यांच्या दरातही मोठी वाढ झाल्याने ग्राहक मेटाकुटीला आले आहेत.

धान आणि गव्हाच्या दरात वाढ झाल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात रवा, मैदा, आटा, पोहे, जाड रव्याच्या दरात वाढ झाली आहे. गौरी-गणपतीत मागणी वाढते. मागणी वाढल्याने दरात वाढ झाल्याची माहिती गुंदेचा यांनी दिली. सणासुदीच्या काळात शेंगदाण्यालाही मागणी वाढते. मात्र, शेंगदाण्याची लागवड कमी झाली आहे. सध्या बाजारात कर्नाटकातून शेंगदाण्याची आवक होत आहे. गुजरातमधील नवीन शेंगदाण्याचा हंगाम सुरू होण्यास एक ते दीड महिन्यांचा कालावधी आहे. शेंगदाण्याची निर्यात वाढली आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून शेंगदाण्याचे दरही वाढले आहेत. त्याबरोबरच तेलाचे दरही चढे आहेत. त्यामुळे शेतक ऱ्यांचा कल तेल उत्पादकांना शेंगदाणा विकण्याकडे आहे. शेतकरी तेल उत्पादकांना शेंगदाण्याची विक्री करत आहेत. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने शेंगदाण्याचे दर कडाडले आहेत. गेल्या आठवडाभरात शेंगदाण्याच्या दरात किलोमागे १५ ते २० रुपयांनी वाढ झाली, असे मार्केट यार्डातील शंेगदाणा व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले.

कारण काय?

ऑगस्टपासून परराज्यातून गव्हाची मोठी आवक होते. मात्र मध्य प्रदेश आणि गुजरातमधून होणारी आवक कमी झाली आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीपर्यंत अन्नधान्याला मागणी राहणार आहे.

आणखी वाढ अपेक्षित..

सणासुदीच्या काळात उपाहारगृहचालक, मिठाई विक्रेते, बेकरी व्यावसायिकांसह सामान्य ग्राहकांकडून रवा, मैदा, आटा, पोहे, जाड रव्याला मागणी वाढते. यापुढील काळात मागणी वाढणार असल्याने दरात आणखी पाच ते दहा टक्क्य़ांनी वाढ होईल, असे पुणे मार्केट यार्डातील चणा डाळ व्यापारी सुमीत गुंदेचा यांनी सांगितले.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा