Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक तयारी

 

राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक तयारी

राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक तयारी


विधानसभा मतदारसंघनिहाय स्थितीचा आढावा, उद्या बैठक


 पुढील वर्षांत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आमदार व पराभूत उमेदवारांची बुधवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यात विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

राज्यातील इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा घेतलेल्या सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत ओबीसींचे राजकीय आरक्षण पूनस्र्थापित होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, असा सूर होता. किं बहुना त्यावर सत्ताधारी व विरोधी पक्षांचे एकमत झाले. काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीतही ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्याशविाय निवडणुका घेऊ नयेत, अशी पक्षाची भूमिका ठरविण्यात आली. मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकांची तयारीही सुरू के ली आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली. मित्रपक्षांबरोबर कु ठे आघाडी करायची, कु ठे स्वतंत्र लढायचे, याबाबत स्थनिक राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्याची रणनीती बैठकीत ठरविण्यात आली. निवडणूक तयारीचा एक भाग म्हणून आता पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पक्षाचे सर्व आमदार व पराभूत उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्य ठाकरेंना टोला

राज्यातील करोना साथरोगाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मुदत संपलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका होतील, परंतु ज्यांना राज्य सरकार निवडणुका पुढे ढकलत आहे, असे वाटते त्यांनी विविध उच्च न्यायालयांच्या आदेशांचा अभ्यास करावा असा, टोला नवाब मलिक राज ठाकरे यांना लगावला.

गर्दीच्या कार्यक्रमावर बंदी

करोनाचा धोका वाढेल, अशा प्रकारे गर्दीला निमंत्रण देणारे राजकीय, धार्मिक कार्यक्रम त्वरित स्थगित करावे, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसने यापुढे गर्दी होईल असा कार्यक्रम घ्यायचा नाही, असा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते  व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा