Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

मुंबई गोवा हायवे मध्ये गडकरींच्या भ्रष्टाचाराचा चिखल - अशोकराव जाधव रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचा घणाघाती आरोप .


 मुंबई गोवा हायवे मध्ये गडकरींच्या भ्रष्टाचाराचा चिखल - अशोकराव जाधव 
रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचा घणाघाती आरोप .


संगमेश्वर: मुंबई गोवा चौपदरी महामार्ग प्रत्यक्षात दहा वर्षा पुर्वी आखणी झाली लोकांच्या जमिनी संपादित केल्या बहुतांशी लोकांना पेमेंट दिले ते ही कायदया प्रमाणे बाजार किंमतीच्या पाच पट देणे आवश्यक असताना रेडीरेकनरच्या दिड पट ते जास्तित जास्त दुप्पट दिले जो रस्ता सन १९७० पासुन केला त्या वेळी ज्या जमिनी संपादीत केल्या तेंव्हा बहुतांशी जमिन मालकांना एकही पैसा नुकसान भरपाई मिळाली नाही ती देणे आवश्यक असताना जेंव्हा सारे रेकॉर्डच गायब होते व त्या म्हणजेच ज्या रस्त्याचे चौपदरी करण होते आहे त्याचे मुळ दोन पदरी रस्ताचे पैसे दिले जाणार नाहीत , तरतूद नाही असे जेंव्हा लिखीत कळवले जाते , रेकॉर्ड ऊपलब्ध करुन दिले जात नाही ,सुनावनी घेतली जात नाही आणि आमदार , खासदार यावर एक शब्दही न बोलता टोल नाकी कशी पदरात पडतील व स्वःहाच्या भावी पिढयांची सोय कशी होर्याल याच्याच विवंचने मध्ये दिसतात . याचाच अर्थ कोकणी मानसाच्या सहन शिलतेच्या मानसिकतेचा अंत पाहातात व गडकरींच्या भ्रष्टाचाराच्या चिखलात येथेच्छ डुंबता आहेत . गडकरींच्या भ्रष्टाचाराची एक नमुना म्हणून दोनच ऊदाहरणे देतो ही दोन ऊदाहरणे म्हणजे हिमनगाचे अतिसुक्ष्म दुर्बोनीने दिसणारी हिमनगाची टोके आहेत त्यातील पहिले ऊदाहरण म्हणजे रस्ताचे चौपदरी करणाचे काम चालू झाले तेव्हा दोन्ही बाजूची सुमारे दोन लाख वृक्ष ज्यांचे वय 3५ वर्षा पासुन ते ५० वर्षा पर्यंत होते या बाबत पर्यावरण बिघडेल असा जेंव्हा सुर निघाला तेंव्हा गडकरींनी रस्ताच्या कडेला झाडे लावण्यासाठी शंभर कोटी रुपये मंजूर केले यातून दोन किंवा तीन वर्षाची झाडांची रोपे लावण्यात येतील व काही नर्सरी धारकांना व बेकार युवक युवतींना रोजगार ऊपलब्ध केला जाईल असे सांगितले प्रत्यक्षात गेल्या आठ वर्षात ना नवीन बेरोजगारांना नर्सरी साठी निधी मिळाला की असतित्वात असलेल्या नर्सरी धारकांना रोपाच्या ऑर्डस मिळाल्या पैसे खर्च मात्र पडले काही बाबत जो भ्रष्टाचार होतो तीथे दहा विस टक्के तरी काम दाखवतात पण ईथे शंभर टक्के भ्रष्टाचार आहे . दुसरे ऊदाहरण गेल्या दोन महिन्या पुर्वीचे मुंबई गोवा हायवे काम चालू असलेने रस्ता खराब झाला आहे रस्तावर किमान एक फुट ते दिड फुट खोल व पंधरा फुटा पासुन दोन फुटापर्यंत रुंदीचे खड्डे पडले आहेत त्या साठी शंभर कोटी रुपये जाहीर केले ते खर्चही झाले पण खड्डे भरणे सोडाच होते त्या पेक्षा मोठे झाले . आणि आमचे मतदारांना भुलथापा देवून आणि आमच्याच थोर आदर्शवत राष्ट्रपुरुषांच्या अस्मिते वर निवडूण आलेले लोक प्रतिनिधी याच रस्ताच्या तुकडयांचे ऊद्यघाटन करून श्रेय लाटण्याचा किळसवाणा प्रकार करताहेत तेंव्हा ऊबग येते . ही दोनशे कोटीच्या गडकरींच्या भ्रष्टाचाराची नमुना दाखल दोनच ऊदाहरणे देत आहे म्हणून गडकरीच्या या चार पदरी भ्रष्टाचाराच्या दललीत तावातावाने भांडणारे एक मेका विरुद्ध खालच्या स्तरावर बोलणारे सारेच कसे सामिल आहेत ते पहा . असा घणाघात अशोकराव जाधव ऊपाध्यक्ष , प्रवक्ते रत्नागिरी जिल्हा काँग्रेस ,265 चिपळूण . संगमेश्वर विधान सभा मतदार संघ निरिक्षक यांनी केला .

...........................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा