Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin eकाव्यपुष्प

..प्रभा..


प्रफुल्लित प्रभा येते

दान चैतन्याचे घेऊन,

होतो चराचराला हर्ष

जाती क्षणही भारावून.

..नखाते ज्ञानेश्वर..

      .परभणी.

-----------------------------------------------------------------------------------


 केल्याने होत आहे रे


हार झाली म्हणून मुळीच

        खचून तू जाऊ नको

हिमालयाची उत्तुंग शिखरे पाहून

        ध्येयेही आपली उत्तुंग ठेव

मान आपली उंच ठेव         ..१..


अपयशाच्या भितीने 

     कर्म करणे  तू  सोडू नको

 प्रयत्नांची कास सोडू नको 

        यश तुझेच आहे ही 

  खुणगाठ मनाशी बांधून ठेव..२..


पराजयाच्या भितीने तू

       समरात पाठ फिरवू नको

पराक्रमाने तळप असा रणांगणावर

       कि विजयश्री नक्की माळ घालेल तूला

 विश्वास हा मनात ठसवून ठेव..३..


कृतीहिन माणसाकडे दैवही पाठ फिरवते

       हे कधीही तू विसरु नको

आत्मविश्वास नेहमी जागृत ठेव

       " केल्याने होत आहे रे "

हा मंत्र मनात सदैव जागृत ठेव..४...


प्रयत्न करत राहिलास तर

     यश मग तुझंच आहे

मुळीच शंका मनात आणू नको

     देव पाठीशी आहे तुझ्या

श्रध्देची ज्योत मनात तेवत ठेव..५..


सुनिता सुरेश महाबळ

बालेवाडी, पुणे

----------------------------------------------------------------------------------


   हर्ष   

हळूच उषा

हसून विलसली

निरोप निशा


छटा सोनेरी

चराचरात दिसे

शांती अंतरीं


स्पर्शून वारा

मनास रिझवितो

हर्ष पिसारा

सौ उषा राऊत

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय:-बहरल्या शब्दकळ्या

शीर्षक:-अस्तित्व


जीवनात उत्सवाचे महत्त्व फार आहे

जीवनात सर्वांच्या संस्कार सारं फार आहे........


आला गणपती सर्वांचाचं खरा विद्यापती

मुर्ती स्थापनेत दडले देवत्व फार आहे........


करी खेळ ऊन्ह सावलीचा, परिक्षा पाही

ठाई ठाई बापाचे दडले सत्व फार आहे........


नानारंगी कार्यक्रम चालती सारीकडेचं

दहा दिवसी उत्सवा दडले बंधुत्व फार आहे........


सारे मिळून राहती, मग एकत्र जमती

सण उत्सवात ते दडले तत्व फार आहे........


मनोभावे करा भक्ती तेव्हा मिळे तुम्हा शक्ती

दैवीक नामात दडले प्रभुत्व फार आहे........


चला स्वच्छ ठेवा चीत,आपसात जागे प्रीत

आरती गायना दडले कर्तृत्व फार आहे........


पुजा अर्चा करा,ध्यान धरा संकटांना टाळा

हाकेला पावते मायेचे मातृत्व फार आहे........


संकटकाळी धावून येऊन विघ्न हरतो

अनेक रुपात दडले दातृत्व फार आहे........


बहरल्या शब्दकळ्या भावविश्व ते फुलले

चमत्कारी जगी दडले अस्तित्व फार आहे........देविदास हरीदास वंजारे 

ता.किनवट जि.नांदेड

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय:-शिक्षणाचा पाया🌈

शीर्षक:-प्रगतीचा झराशिक्षणाचा पाया

मजबूत करा,

शिका संघटीत

व्हा संघर्ष धरा.


झेप घ्या शिखरी

गाठा आसमंत,

खूप शिकुनिया

व्हाल गुणवंत.


सोडा सर्व मोह

नको तो आराम,

क्षणीक सुखास

द्या पूर्ण विराम.


ख-या गरीबीची

असू द्यावी जाण,

सत्यासाठी लढा

तेव्हा मिळे मान.


सतत कष्टतो

प्रयत्न करतो,

पाण्यासम घाम

सदैव झरतो.


शिकून मोठे व्हा

घरा बांधा बंगला,

पाहून विकास

हरेक दंगला.


लिहिले बाबांनी

जगी संविधान,

,या बहुजनास

दिले वरदान.


सारा चमत्कार

शिक्षणाचा खरा,

शिक्षण सर्वांच्या

प्रगतीचा झरा.


शिक्षण ते शस्त्र

शिक्षण ते वस्त्र,

सा-या दुःखासाठी

शिक्षण ते अस्त्र.


म्हणुनीया शिका

जगा नी जगू द्या,

वैर शत्रुत्व संपवा

तो बंधुभाव ल्या.


देविदास हरीदास वंजारे 

ता.किनवट जि.नांदेडShare on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments :

टिप्पणी पोस्ट करा