Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राजापूर शहरात महामार्गालगतच खाजगी ट्रॅव्हल्स बसेस थांबत असल्याने अन्य वाहनचालकांना सहन करावा लागतोय मनस्ताप



 राजापूर शहरात महामार्गालगतच खाजगी ट्रॅव्हल्स बसेस थांबत असल्याने अन्य वाहनचालकांना सहन करावा लागतोय मनस्ताप


रत्नागिरी प्रतिनिधी:-

राजापूर शहरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग लगत खाजगी ट्रॅव्हल बसेस पार्किंग केल्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या अन्य वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुण्यावरून अनेक खासगी ट्रॅव्हल बसेस राजापूर तालुक्यात आलेल्या आहेत. बहुतांशी ट्रॅव्हल बसेस राजापूर शहरात साईनगर परीसरात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या नजीक पार्किंग करून ठेवण्यात आल्या आहेत. काही वेळेला या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होते त्यामुळे अन्य वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. खाजगी ट्रॅव्हल बसेसच्या मालकांना मुंबई-गोवा महामार्गालगत पार्किंगची परवानगी देण्यात आली आहे का असा सवाल उपस्थित होत असून प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने आवश्यक त्या तपासण्या करण्यात आल्या आहेत का असाही सवाल उपस्थित करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रत्नागिरी विभागाने या खासगी ट्रॅव्हल बसेसना परवानगी दिली आहे का असाही सवाल उपस्थीत केला जात आहे. खासगी ट्रॅव्हल बसेसच्या पार्किंगसाठीचे नेमके नियम काय आहेत?, पोलिस प्रशासनकडून अथवा तहसिल प्रशासनाकडून अशा काही परवानग्या देण्यात आल्या आहेत का?, नियम कशा पद्धतीने आहेत? असेही सवाल उपस्थित केले जात आहेत.

..........................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा