Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

वस्त्रोद्योगाच्या आधुनिकतेसाठी केंद्राकडून १०,६८३ कोटी


वस्त्रोद्योगाच्या आधुनिकतेसाठी केंद्राकडून १०,६८३ कोटी

वस्त्रोद्योगाच्या आधुनिकतेसाठी केंद्राकडून १०,६८३ कोटी


 देशातील वस्त्रोद्योगाला आधुनिकतेचा आयाम देण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादनाशी निगडित प्रोत्साहन योजनेला (पीएलआय) बुधवारी मंजुरी दिली. या अंतर्गत येत्या पाच वर्षांंमध्ये १० हजार ६८३ कोटी रुपये प्रोत्साहनपर दिले जाणार आहेत. निवडक राज्यात ही योजना राबवली जाणार असून त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.

केंद्र शासनाच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये १३ उद्योग क्षेत्रांसाठी ३७.५ लाख कोटी रुपये खर्चाची आणि एक कोटी रोजगार निर्माण करणारी उत्पादनबद्ध प्रोत्साहन योजना जाहीर केली होती. त्याचे पुढचे पाऊल म्हणून बुधवारी वस्त्रोद्योगासाठी ही योजना जाहीर केली आहे. त्यानुसार साडेसात लाख लोकांना अतिरिक्त रोजगार उपलब्ध होणार असून अप्रत्यक्षरीत्या अनेकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. महिलांनाही मोठी संधी दिली जाणार आहे.

पाच वर्षांंमध्ये १०,६८३ कोटी रुपये प्रोत्साहनपर निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगात १९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन पाच वर्षांत ३ लाख कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होणे अपेक्षित आहे. त्यामुळे भारत जागतिक वस्त्र व्यापारात आपले पूर्वीचे वर्चस्व प्रस्थापित करील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आत्मनिर्भर भारत ही संकल्पना पुढे नेणारी ही योजना आहे, असे केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.

मानव निर्मित धागा, तयार कपडे (गारमेंट), तांत्रिक वस्त्रनिर्मितीला (टेक्निकल टेक्स्टाईल) उत्तेजन दिले जाणार आहे. कापूस आणि अन्य नैसर्गिक धाग्यापेक्षा मानवनिर्मित धाग्यांवर आधारित वस्त्रोद्योग अधिक वाढावा असे हे धोरण आहे. यामध्ये किमान ३०० कोटी रुपये आणि किमान १०० कोटी रुपये गुंतवणूक असणारे उद्योग अशी विभागणी करण्यात आली आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा व ओडिसा या राज्यात गुंतवणुकीवर भर देण्यात येणार आहे. विशेषत: तृतीय व चतुर्थ श्रेणीची शहरे आणि ग्रामीण भागात असे उद्योग सुरू व्हावेत, अशी सरकारची भूमिका आहे.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा