Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

                            

शब्द लहरी


 ज्ञानेश्वरीतील   सुंदर  प्रतिमाने


      ते  पौरूष  तुझे  अवधूत  ।  आइकोनिया  हे  समस्त  । जाहले
आथि  विरक्त ।  जिवितेसी। 

          जैसा  सिंहाचिया  हाकां ।युगांतु
  होय  मदमुखा  ।  तैसा  कौरवा  अशेखा।
  धाकु  तुझा ।।
         जैसे  पर्वत  वज्राते  ।  ना  तरी  सर्प  गरूडाते ।  तैसे  अर्जुना  हे  तू  ते।
 मानिती  सदा ।।

        हे  अर्जुना  तुझ्या  अपूर्व  शौर्याचा
 महिमा  ऐकून  हे  सर्व  कौरव  आपल्या
 जिवीताची  आशा  सोडून  प्राणावर  उदार  झाले  आहेत .

       ज्या   प्रमाणे   सिहांची  गर्जना  
ऐकल्यावर   मदोन्मत्त  हत्तीलाही
 प्रलय  काळच  ओढवला  असे  वाटते
 त्या प्रमाणे  या  सर्व  कौरवांना  तुझा
 धाक   वाटतो.

       ज्या प्रमाणे  पर्वत  वज्राला  किंवा
 सर्प  गरूडाला  भयप्रद  समजतात
 त्या  प्रमाणेच  हे  कौरव  तुला  नेहमी
मानतात .


सौ.  शैलजा  जाधव (पाटील)
           चांदवड   नासिक

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

विचारधारा

सुख शोधायला निघाले तर... सारं आयुष्य कमी पडेल....तरी सुखाची प्राप्ती होणार नाही. त्यासाठी, आपल्या मनामध्ये सदैव समाधान,शांती, सेवा, त्याग आत्मविश्वास, आणि सहनशीलता  ह्या अति महत्त्वाच्या गोष्टी,  कायमच आपल्यापाशी ठेवले तर... सुख काय असते ते, जवळून आपल्याला बघायला मिळेल... कुठेही शोधण्यासाठी जावे लागणार नाही. ह्या साऱ्या गोष्टी आपल्या पाशीच आहेत.. फक्त आपल्याला शोधता आलं पाहिजे....


सौ. संगीता संतोष ठलाल

मु. कुरखेडा जि. गडचिरोली
-----------------------------------------------------------------------------------ज्ञानेश्वरीतील   सुंदर  प्रतिमाने


       
आणि  हे  पळता  पळो  ने  देती । धरोनी
अवकळा  करिती । न  गणित  कुटी  बोलती।  आइकता  तुज  ।।

        मग  ते  वेळी  हिये  फुटावे । आता
लाठेपणे  का  न  झुंजावे .? । हे  जितले
तरी  का  न  भोगावे ।  मही तळ ।।

        ना  तरी  रणी  एथ ।  झुंजता  वेचले
जिवीत  । तरी  स्वर्गसुख  अनकळित  ।
पावशील  ।।


       आणि  आता  जर  तू  पळून  जाऊ
लागलास  तर हे  तुला  जाऊ  देणार
नाहीतच  उलट  तुला  धरून  आणून
तुझी  फजिती  करतील.  आणि  तू 
ऐकत  असता  तुझ्या  तोंडावर  तुझी
अतिशय  निंदा  करतील .

      ते  मर्मभेदक  शब्द  ऐकून अंतःकरण 
विदीर्ण  होण्यापेक्षा  आत्ताच शौर्याने  युद्ध
का  करू  नये . जर  ह्यांना  तू  जिंकलेस
तर  प्रुथ्वीचे  राज्य  भोगशील .

          अथवा  रणामधे  युद्ध  करतांना
तुझे  प्राण  ख़र्ची  पडले  तर  अनायासे
सहजच  स्वर्ग सुख  प्राप्त  होईल .


       सौ.  शैलजा  जाधव (पाटील)
           चांदवड   नासिक
-----------------------------------------------------------------------------------

ज्ञानेश्वरीतील   सुंदर  प्रतिमाने


     सांगे  प्लवेचि  काय  बुडिजे  । कां
मार्गी  जाता  आडळिजे । परी  विपाये
चालो  नेणिजे ।  तरी  हे ही  घडे  ।।

       अम्रुते  तंरीच   मरिजे ।  जरी  विखेसि  से्विजे  । तैसा  स्वधर्मी  दोषु
पाविजे । हेतुकपणे  ।।

          म्हणौनिया  पार्था  । हेतू  सांडोनिया  सर्वथा । तुज  क्षात्रव्रुत्ती
झुंजता ।  पाप  नाही ।।


      अर्जुना  तुच  सांग की  ना्वेत बसल्यानेच  कोणी  बुडेल  का?
किंवा  चांगल्या  रस्त्याने  जात
असतांना  कोणी  ठेच  लागून
  अडखळेल  काय ? पण एखाद्या स
नीट  चालताच  येत  नसेल  तर तसेही
घडेल .

       दूध  प्यायल्याने  मरण  येणार  नाही
पण ते  दूधच  विषा बरोबर  सेवन  केले
तर त्या  दूध पिणाऱ्यास  मरण  येईल .
त्याच प्रमाणे  स्वधर्माचे  आचरण  
केल्याने ही  दोष  लागतील   जेव्हा
मनात  फलकामना  धरली  असेल  तर

       म्हणून  अर्जुना  फलैच्छा  सर्व थैव
सोडून  क्षत्रिय  धर्माने  युद्ध  कर .म्हणजे
पातकाचा  लेशही  तुला  लागणार  नाही.

सौ.  शैलजा  जाधव (पाटील)
           चांदवड   नासिक
[12:44, 13/09/2021] Labhesha 2: विचारधारा

माणसा, माणसांमध्ये जर... आपण नेहमीच  भेदभाव करीत राहिले तर....हाती काहीच लागणार नाही. उलट नुकसान  शेवटी आपलचं होईल.. आणि दुसऱ्यांचे सुद्धा हे, मात्र खरे आहेच पण, त्याच ठिकाणी जर... आपण, माणुसकीच्या नात्याने सर्वांना  बघितले तर... भेदभाव नावाचे शब्दच दिसणार नाही. हे, सुद्धा तेवढेच खरे, आहे.कारण,ज्या, वेळी आपल्यावरती संकटे येतात तेव्हा, भेदभावाची भावना मनात अजीबात येत नाही तर... फक्त त्याच्यांकडे पाहून आपल्यावरती आलेले हे, भयानक संकट   कसे दूर करतील...अशाप्रकारचीच त्यांच्याविषयी मनात आशा निर्माण होते. ..
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सौ. संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
[12:46, 13/09/2021] Labhesha 2: 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
🦚🎄🌳🌱💐🌷🌞🌺🌜💫🌟🌈🌨️🌊
   निसर्ग
🌷 पुष्प क्रमांक ४८ 🌷
निसर्गातील सर्वात महत्त्वाची झाडे देखील आपल्याप्रमाणे श्वसन क्रिया करत असतात,कारण ते ही सजीव आहेत. ज्यामध्ये ऑक्सिजन बाहेर सोडून कार्बन डायऑक्साइड आत घेतात.माणसासाठी आणि इतर सजीवांना ऑक्सिजन आवश्यक असतो.वनस्पती सोडून सर्व सजीव कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात.म्हणजेच झाडे आणि सजीव हे एकमेकांना प्राण प्रदान करतात असे म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही.तसेच गाड्यांमधून आणि कारखान्यांमधून बाहेर पडणारे विषारी वायू हे देखील झाडेच शोषून घेतात.म्हणजेच झाडे वातावरण शुद्ध ठेवण्याचे ही कार्य करतात.म्हणून जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे.
✍️
सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
दिनांक :- ११/९/२०२१
[12:46, 13/09/2021] Labhesha 2: 🌺'शेवटची गणेश मुर्ती'

      त्या गणेश मुर्ती विक्रीच्या स्टॉलमधे  'तो' आज सातव्यांदा आला होता. जुनाटसा, कोणत्या तरी मंडळाचा, कदाचित फुकटच मिळालेला टी शर्ट व साधी कॉटनची मळलेली पॅन्ट असा त्याचा पेहराव होता. 

दरवेळी तो यायचा..त्या कमळावर बसलेल्या शाडूच्या गणेश मूर्ती ज्या रॅकवर ठेवलेल्या होत्या, तिथे तो जायचा... बराच वेळ त्या मूर्तींकडे देहभान विसरुन पहायचा, मग किंमत विचारायचा...
'कितना को..दिया..गणेशजी?' 

 दरवेळी दुकानातला मुलगा त्याला सांगायचा 
'अंकल...साडे छहसो रुपये...सीक्स हंड्रेड फिप्टी. दे दूं..?'

तिच किंमत असूनही तो प्रत्येक वेळी..
'अय्यो....ईतना..?' असे स्वतःशीच म्हणायचा..खिशात हात घालून काही तरी चाचपायचा, व पुन्हा एकदा त्या गणेश मुर्तींकडे डोळे भरुन पाहून, उदासपणे बाहेर पडायचा. 

बाजूच्या चौकात भाजी विकायचा तो..
रात्री गाडी त्या चौकातून  ढकलत, आ…
[12:46, 13/09/2021] Labhesha 2: 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
🦚🎄🌳🌱💐🌷🌞🌺🌜💫🌟🌈🌨️🌊
   निसर्ग
🌷 पुष्प क्रमांक ४९ 🌷
मानवाने आता निसर्ग संवर्धनासाठी पाऊल उचलले पाहिजे.वृक्षतोड जर झाली तर आपण आपलेच नुकसान करवून घेत आहोत.परिसरात झाडे नसल्याने उष्णता वाढत आहे.मानवी त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी ही उष्णता काही हितावह नाही. तसेच वायू प्रदूषणही झाल्याने आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.वृक्षतोड थांबवून परिसरात जर झाडांची संख्या वाढवली तर माणसाचे आरोग्य सुधारेल आणि दुष्काळ कधी येणार नाही.
✍️
सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
दिनांक :- १२/९/२०२१
[12:46, 13/09/2021] Labhesha 2: 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
🦚🎄🌳🌱💐🌷🌞🌺🌜💫🌟🌈🌨️🌊
   निसर्ग
🌷 पुष्प क्रमांक ५० 🌷
निसर्गातील झाडे आपली मुळे जमिनीत खोलवर नेतात.त्यांना पाण्याची गरज भासते. पाऊस पडल्यावर जमिनीत मुरणारे पाणी झाडांची मुळे आपोआप शोषून घेतात. त्यामुळे झाडांची वाढ होते. जमिनीचा कस नियंत्रित राखला जातो. मातीची धूप होत नाही. पण जर वृक्षतोड झाली तर मातीची धूप होऊन जमिनीचा कस संपुष्टात येईल. पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही. प्राणी आणि पक्षी जीवन संपुष्टात येईल.म्हणून भरपूर झाडे लावावीत,त्यांचे संगोपन करावेत.
✍️
सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४
दिनांक :- १३/९/२०२१

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा