Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

खासदार विनायक राऊत दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजी रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरील आंबा घाट रस्त्याची करणार पाहणी व रत्नागिरी – कोल्हापूर - नागपूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला वाटपबाबत घेणार आढावा...


 खासदार विनायक राऊत दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजी रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरील आंबा घाट रस्त्याची करणार पाहणी व रत्नागिरी – कोल्हापूर - नागपूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला वाटपबाबत घेणार आढावा...


आंबा घाटाला पर्यायी मार्ग म्हणून प्रलंबित असलेला देवरूख कुंडी घाट मार्गाचा घेणार आढावा

       

दि. २२ जुलै २०२१ रोजीच्या अतिवृष्टीमध्ये रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरील आंबा घाट ढासळल्यामुळे २ महिन्यांपासून अवजड वाहतूक बंद आहे. कोकण विभागाकडून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना हा रस्ता अत्यंत सोयीस्कर मार्ग आहे. दररोज दूध, अंडी, धान्य, भाजीपाला, इतर दैनंदिन वस्तू व फिनोलेक्स, अल्ट्राटेक, जिंदाल या कंपनीमधून या मार्गाने वाहतूक केली जाते. परंतु मागील काही महिन्यांपासून हा मार्ग बंद असल्यामुळे वाहतुकदारांची खूप अडचण होत आहे. आंबा घाट मार्गे जाणारी वाहतूक अन्य मार्गावरुन वाहतूक केल्यामुळे गाडीला लागणाऱ्या डिझेल खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे वाहतुक व्यवसाय करणेही मुश्कील झाले आहे. तसेच एस.टी. वाहतूकही पूर्णपणे थांबली असल्यामुळे शैक्षणिक व वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या लोकांची खूप गैरसोय निर्माण झालेली आहे. 

तरी आंबा घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने करुन, पुन्हा एकदा वाहतुक पूर्ववत करण्याची आवश्यकता आहे. तरी त्या अनुषंगाने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता साखरपा ते आंबा घाट रस्त्याची पाहणी करणार आहेत. तसेच रत्नागिरी-कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मोबदला वाटप संदर्भात व आंबा घाटाला पर्यायी मार्ग म्हणून सर्वेक्षण कामाला प्रशासकीय मान्यता मिळालेल्या देवरूख हरपुडे कुंडी घाट रस्त्याची आढावा बैठक दु.०१.०० वाजता साखरपा ग्रामपंचायत ता.संगमेश्वर या ठिकाणी आयोजित केलेली आहे.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा