Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

 



काव्यपुष्प

------------------------
 बात नहीं बनेंगी...

सौ चाँद चमकालो तब भी बात नहीं बनेंगी।
आज कोई भी  मनाले हमें बात नहीं बनेंगी।

मासूम  चेहरें  हमें  बहोत  सताया  है आज 
तरस  नहीं  खाएंगे आज  बात नही  बनेंगी।

कितने भी नुस्ख़े आज़मालो या हमारे आगे
हाथ भी जॉड लो बात तो आज नहीं बनेंगी।

चाहें तुम चूड़ियाँ की  आवाज़ करो या और 
कोई  तरीका  आज़माओ बात  नहीं बनेंगी।

चाहें हज़ारों नख़रे करो य कोई भी तरक़ीब
ढूंढ निकालो तुम आज बात तो नहीं बनेंगी।

हँसाकर  रुलाकर  कितनी भी  चालाकियों
की जाल  बिछालों आज  बात नहीं बनेंगी।

हमारा  मन  दिल  दिमाग़  तीनों  एक साथ 
रूठ  गए है आज  तुमसे  बात नहीं बनेंगी। 

     नीक राजपूत
     9898693535
-------------------------
चारोळी
"प्यारसे जीतों दुनियाँ
छोड के सब शिकवें गिलें
फेको दूर आँचल नफरत का
जाना तो है "कब्रमें" अकेले"

सौ.मेहमूदा शेख.(देहूगाव)

--------------------------------

हर्ष 

शुभ सकाळ
गुणगुणत आली
वारा खट्याळ

ऊन केशरी
लोळण घेई अंकी
हर्ष अंतरी

खग उडती
मुक्त घरट्यातून
जीव झटती


सौ उषा राऊत
--------------------------

 लतादीदी !

लतादीदी गान कोकीळा 
गान सम्राज्ञी ती मानाची,
स्वर मंजुळ झंकार तिचा
तृप्ती करीती या कानाची!१

सुर संगीत तपस्या मोठी
महाराष्ट्राची ती आहे शान
लतादीदी मराठी मातीची
तिचा आहे मला अभिमान!२

सुख आनंदाच्या गोड लहरी
स्वरराशी गायनी असतात
भक्ती,आराधना,विरह आणि
सरी दुःखाच्याही मनी असतात!३

जाते तिची आकाशी वाणी
घरोघरी लहरते आकाशवाणी 
जातो दिवस फार हा गोड
ऐकता लतादीदीची ती गाणी!४

वाढदिवसाच्या देतो शुभेच्छा 
लतादीदी ही व्हावी दीर्घायुष्यी
स्वरसागर तिचा कधी न आटावा
मिळावा गायन आनंद दरदिवशी!

   कवीवर्य तथा शीघ्रकवी  
   श्री.कृष्णा दामोदर शिंदे.

-----------------------------

विषय:-चंद्र आहे साक्षीला
शत जन्मीची साथ

तुला बघता माझे
नयन ते दीपले,
चंद्र आहे साक्षीला
राग,द्वेष लोपले..........

मैत्री करण्यासाठी
सुटले धुंद वारे,
नातं जुळविण्यास
नभी चमके तारे..........

सर्व भावना मज
करती ओलेचिंब,
प्रकाशात तुझेचं
पाहतो प्रतिबिंब..........

फुलले मन आत
खुलले जग छान,
भुलले सर्वकाही
उमलले गेले भान..........

तुझ्या त्या होकाराने
अवतरला स्वर्ग,
गोड स्मीत हास्याने
सुखाचा झाला वर्ग..........

शत जन्मीची साथ
देऊनी घे आकार,
प्रेमळ ते जीवन
आनंदाने साकार..........

देविदास हरीदास वंजारे ता.किनवट जि.नांदेड

---------------------------

नारी दुर्लक्षित..…

कुठे आहे इथे । कधी सुरक्षित ।
नारी दुर्लक्षित । सर्वकाळ ।।

गाय तिच्यापेक्षा । आहे भाग्यवान ।
करतो सन्मान । जग सारा ।।

आपली असेल । तर तिचे लाड ।
म्हणे वस्त्र फाड । परक्यांचे ।।

माणूस आजचा । तुच्छ झाला किती ।
कायद्याची भीती । कुठे आहे? ।।

परनारी वाटे । फक्त भोगायला ।
नाही जपायला । शिल तिचे ।।

नराधम फार । थोडेसे सज्जन ।
करती व्यसन । युवा पिढी ।।

वाईट कर्मात । मौज वाटे फार ।
भुलून संस्कार । पिढी गेली ।।

माणुसकी लोप । पावत चालली ।
वासना शिरली । मनामध्ये ।।

माणूस बनून । दैत्य फिरतात ।
अब्रु लुटतात । जागोजागी ।।

सज्जनहो जरा । निद्रेतून जागा ।
शोधावया लागा । दैत्य जना ।।

देण्यासाठी लढा । त्यांना योग्य शिक्षा ।
करणे प्रतिक्षा । नको आता ।।

विश्वाच्या कल्याणा । हवी आहे नारी ।
घडवा संस्कारी । बालकांना ।।

अजु म्हणे करा । शुद्धची विचार ।
कोणास लाचार । जाणू नका ।।


शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा