Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना सहा जिल्ह्यात होत असलेल्या निवडणुका पुढे घेण्यासंदर्भात ओबीसी सेल भाजपा रत्ना(द) तर्फे निवेदन

 



ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना सहा जिल्ह्यात होत असलेल्या निवडणुका पुढे घेण्यासंदर्भात ओबीसी सेल भाजपा रत्ना(द) तर्फे निवेदन


रत्नागिरी : ओबीसी सेल भाजपा रत्ना(द) तर्फे ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना सहा जिल्ह्यात होत असलेल्या निवडणुका पुढे घेण्याविषयासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणूका शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या. जर या आघाडी सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आज आमच्या ओबीसी बांधवावर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती. पण या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणून बुजून काढून घ्यायचे होते म्हणून त्यांनी कोर्टाला इम्पेरियल डेटा दिला नाही व ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले. म्हणजेच या सरकारने मागासवर्गीय आयोग नेमून सुद्धा कुठलीही कार्यवाही केली नाही. फक्त आणि फक्त ओबीसी समाजाला आशेवर ठेवून पद्धतशीरपणे निवडणुकीतून बाजूला केले. म्हणून ह्या सरकारचा ओबीसी समाजाच्या वतीने व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. या पुढे ओबीसी समाजाने शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारला निवडणुकीतून हद्दपार करण्यासाठी एकजुटीने लढण्याची व ह्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. जो पर्यंत राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू होत नाही तो पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यात येऊ नये, अशी मागणी सदर निवेदना मार्फत करण्यात आली आहे. यावेळी ओबीसी सेल भाजपा रत्ना(द) चे जिल्हाध्यक्ष राजन कापडी, जिल्हा सचीव राजेश सावंत, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, जिल्हा कार्यकारीणी सदस्य राजीव कीर, ओबीसी सेल युवक जिल्हाध्यक्ष निलचंद्र साळुंखे, दामोदर आण्णा लोकरे, भाजपा तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, ओबीसी युवक तालुकाध्यक्ष गजानन धनावडे, शंकरशेठ लाड, दादा ढेकणे, लक्ष्मण लिंगायत आदी उपस्थित होते.

..........................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा