Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

जैन समाजाने केलेली प्रगती, त्यांचे योगदान आणि प्रभाव


जैन समाजाने केलेली प्रगती, त्यांचे योगदान आणि प्रभाव- चित्तरंजन चव्हाण,(हिंदू)

jainstoday@gmail.com 


जैन समाज भारतातील एक अतिशय कमी लोकसंख्या असणारा समाज आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये जैनांची संख्या अर्धा टक्काही नाही. पण त्यांचे योगदान त्यांच्या संख्येच्या मानाने फारच मोठे आहे. 

पुढे जैन समाजातील कांही प्रसिद्ध लोकांची यादी दिली आहे, त्यावरून त्यांचे विविध क्षेत्रातील योगदान लक्षात येईल:


● शिक्षणाची गंगा पश्चिम महाराष्ट्रातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणारे कर्मवीर भाऊराव पाटील

● मराठी व हिंदी सिनेमा सृष्टीत सुवर्णयुग आणणारे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार व्ही. शांताराम

● आशिया खंडामधील पहिल्या स्टॉक एक्स्चेंजची स्थापना करणारे प्रेमचंद रायचंद

● भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची स्थापना करणारे डॉ. विक्रम साराभाई (ज्यांना फादर ऑफ इंडियाज स्पेस प्रोग्रॅम असे ओळखले जाते)

● भारतातील कापड गिरणी कामगारांची पहिली संघटना बांधणारी अनसया साराभाई

● गांधीजीना ख्रिस्ती होण्यापासून परावृत्त करणारे व गांधीजींचे आध्यात्मिक गुरु श्रीमद राजचंद्र

● 1893 साली शिकागो येथे झालेल्या पहिल्या धर्म परिषदेत हिंदू धर्मावर झालेल्या टीकेचे खंडन करणारे वीरचंद गांधी

● छ. संभाजी महाराजांचे एक सेनानी खानगौंड देसाई

● महाराणा प्रताप यांचे सेनापती भामाशाह

● पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडणारी राणी अबक्का

● पाकिस्तानी विमानांना पळवून लावणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान

● ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणारे पहिले भारतीय धावपटू पी. डी. चौगुले

● सामूहिक विवाह ते पाणी प्रश्न सोडवण्यापर्यंत अनेक प्रकारची सामाजिक कामे मोठ्या प्रमाणावर करणारे शांतीलाल मुथ्था

● पंजाब, काश्मीर यांना महाराष्ट्राशी जोडणारे संजय नहार

● शेतकऱ्यांच्या उसाला रास्त भाव मिळवून देणारे राजू शेट्टी

● भारतात जहाज उद्योग, विमान निर्मिती सुरु करणारे सेठ वालचंद हिराचंद

● भारतातील पहिली स्कूटर बनवणारे आणि जगातले रिक्षा नावाचे पहिले वहान सुरु करणारे नवलमल फिरोदिया

● शाहू महाराजांचे पहिले चरित्र लिहिणारे आणि महाराष्ट्राचे पहिले अर्थमंत्री आण्णासाहेब लठ्ठे

● अनेक मराठी कलाकारांना चंदेरी पडद्यावर आणणारे निर्माते ताराचंद बडजात्या

● संगीतकार गीतकार व गायक रविंद्र जैन

● संगीतकार कल्याणजी आनंदजी

● कर्नाटकच्या शैव, वैष्णव आणि जैन समाजाचे महान गुरु धर्माधिकारी वीरेंद्र हेग्गडे वगैरे. यामध्ये आणखी अनेक नावे जोडता येतील, पण सध्या एवढेच पुरे.


जैन समाजाने विविध क्षेत्रात किती प्रगती केली आहे आणि संख्येने अतिशय कमी असूनही त्यांचा प्रभाव किती मोठा आहे हे पहाणे महत्वाचे ठरेल.

● जैन समाज हा भारतातील सर्वाधिक साक्षर समाज आहे. भारतातील सर्व लोकांची सरासरी साक्षरता 65.38%आहे, तर जैन समाजाची सरासरी साक्षरता 94.1% आहे. भारतातील सर्व समाजातील स्त्रियांची सरासरी साक्षरता 54.16% आहे, तर जैन समाजातील स्त्रियांची सरासरी साक्षरता 90.6% आहे. (संदर्भ: जनगणना रिपोर्ट 2011)

● जैन समाज हा भारतातील सर्वाधिक श्रीमंत समाज आहे. (संदर्भ: National Family and Health Survey, 2015-16).

● भारतात सर्वात जास्त काळ जगणारे लोक जैन समाजाचे आहे. (संदर्भ: जनगणना रिपोर्ट 2011)

● भारतातील व जगातील हिरा उद्योगात जैन समाजाचे वर्चस्व आहे. बेल्जियम हा देश हिऱ्यांची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे व तिथे जैन व्यापाऱ्यांनी ज्यू व्यापाऱ्यांना मागे टाकले आहे.

● भारतातील अनेक राज्यांमध्ये होलसेल व्यापारावर जैन समाजाचे वर्चस्व आहे.

● भारतातील शेअर मार्केटवर जैन समाजाचे वर्चस्व आहे.

● भारतातील टाईम्स ऑफ इंडिया ग्रुप, तसेच लोकमत समूह, गुजरात समाचार  हे जैन कुटुंबांच्या मालकीचे आहेत. टाईम्स ऑफ इंडिया हे भारतातील सर्वात जास्त खपाचे इंग्रजी वर्तमानपत्र आहे आणि ते एकाचवेळी 12 शहरांमधून प्रकाशित होते. या ग्रुपची इतर वर्तमानपत्रे म्हणजे महाराष्ट्र टाईम्स, नवभारत टाईम्स, इकॉनिमिक टाईम्स, मुंबई मिरर वगैरे.

●  जैन समाजाची प्रगती केवळ व्यापार, उद्योग यातच नसून या समाजातून कित्येक वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी, सैन्य अधिकारी, पोलीस अधिकारी, वरिष्ठ न्यायाधीश, शास्त्रज्ञ, संशोधक, संगीतकार, गीतकार, सिनेदिग्दर्शक, वरिष्ठ पत्रकार, संपादक, खेळाडू, प्रख्यात डॉक्टर्स, सी. ए. झाले आहेत.

● जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे वॉरन बुफेट हे लवकरच रिटायर होणार आहेत आणि त्यांच्या जागेवर अजित जैन हे येणार आहेत.

● अमेरिकेतील नवीन जैन यांच्या मून एक्स्प्रेस या कंपनीला अमेरिकन सरकारने चंद्रावर खाणी काढायला परवानगी दिली आहे. 

● भारतात सर्वाधिक गोशाळा या जैन समाजाद्वारे संचालित आहेत. 

● नेत्रदान, अवयवदान यामध्ये जैन समाज आघाडीवर आहे.

● भारतात जैन समाजाने स्थापन केलेल्या व जैन समाजाद्वारे संचालित हजारो शाळा, हायस्कूल्स, कॉलेजेस आणि कांही विद्यापीठीही आहेत. या शिक्षण संस्था केवळ जैन विद्यार्थ्यांसाठी नसतात तर सर्वांसाठी असतात. 

● जैन समाजाने आपल्या उद्योग धंद्यामध्ये, शैक्षणिक संस्थामध्ये, धार्मिक संस्थांमध्ये लाखो लोकांना रोजगार दिला आहेत. हे लाखो लोक बहुतांशाने अजैन आहेत. 

●  भारतीय राजकारणात सध्या जैन लोक फारसे दिसत नसले तरी सरकारच्या आर्थिक आणि औद्योगिक धोरणांवर जैन उद्योगपतींचा प्रभाव आणि वचक आहे.

●  सर्वपक्षीय नेते जैन साधूंकडे जाऊन त्यांचा सल्ला व मार्गदर्शन घेत असतात. उत्तर भारतात हे जास्त पाहायला मिळते. राजकारणी लोकांना मते मिळवण्यासाठी जैन समाजाचा फारसा उपयोग नाही, तरीही हे लोक जैन साधूंकडे जातात त्याचे कारण आध्यात्मिक आहे.

● पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जैन धर्माचा प्रभाव आहे.

● खुद्द महात्मा गांधी यांच्यावर जैन धर्माचा मोठा प्रभाव होता. त्यांची आई जैन होती तर वडील वैष्णव होते. त्यांचे आध्यत्मिक गुरु श्रीमद राजचंद्र हे एक मोठे जैन तत्वज्ञानी होते. 

● हिंदू समाजातील अनेक समूहांवर जैन धर्माचा मोठा प्रभाव आहे आणि त्या समूहांमधून शेकडो जैन मुनी व साध्वी झाल्या आहेत.

● भारतीय ज्ञानपीठ संस्थेतर्फे भारतातील सर्वश्रेष्ठ साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात येतो. भारतीय ज्ञानपीठ ही संस्था पुरस्कार साहू शांती प्रसाद जैन यांनी सुरु केली व पुढे त्यांनीच ज्ञानपीठ पुरस्कार द्यायला सुरवात केली. 

● अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्यवसायाने बिल्डर आहेत. त्यांच्या व्यवसायातील भारतातले पार्टनर्स हे जैन समाजातील आहेत. 

● जैन समाज अतिशय अल्पसंख्य असूनही सर्व चांगल्या हॉटेल्सपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवेपर्यंत सगळीकडे जैन फूड मेनू उपलब्ध असतो.


जैन समाजाने केलेल्या प्रचंड प्रगतीमागे अनेक रहस्ये आहेत. माझ्या पुढच्या लेखात मी ती रहस्ये उलगडून दाखवणार आहे.


*फ्रेश # स्वाध्याय :

फ्रेश न्यूज ( प्रवीण किणे उर्फ क्रांतीसागर )

7020843099


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा