Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

 

      

 शब्द लहरी 

------------------------------------

 ज्ञानेश्वरीतील   सुंदर  प्रतिमाने


      जेथ   कामू  उपजला  ।  तेथ  क्रोधु
आधिची  आला  । क्रोधी  असे  ठेवला ।
संमोह  जाणे ।।

        संमोहा  जालिया  व्यक्ती । तरी
नाशु  पावे  स्मृती  । चडवाते   ज्योती ।
आहत   जैसी  ।।

        का  अस्तमानी  निशी  । जैसी  सूर्य
तेजाते  ग्रासी  । तैसी  दशा  स्मृती भ्रंशी
प्राणियांसी  ।।


           हे  अर्जुना  जेथे  काम  उत्पन्न
झाला  तेथे  अगोदरच क्रोध  आपले  बिऱ्हाड  घेऊन  ठेवल्या सारखा  आलाच
म्हणून  समज . व  क्रोध   जेथे  आला  तेथे  कर्तव्याकर्तंव्य विषयीचा  अविचार
ठेवलेलाच  आहे  हे  जाणून  घे .

          ज्या  प्रमाणे  संमोह  अभिव्यक्त
झाला  की  अविचारामुळे  स्मृती  नाश
पावते .

      सूर्य  मावळण्याची  वेळ  होताच  रात्र
जशी  सूर्याला  गिळून  टाकते . त्या प्रमाणे
स्मृती चा  भ्रंश  झाल्यावर  मनुष्याची 
तशीच  अवस्था  होते.


     सौ.  शैलजा  जाधव (पाटील)
           चांदवड   नासिक

---------------------------------------

 विचारधारा

कधीकाळी,आपल्या मनासारखे घडते तेव्हा,आपला आनंद गगनात मावत नाही. पण, एखाद्या वेळी खूप प्रयत्न करून सुद्धा, आपल्या हाताला यश येत नाही. त्यावेळी चूकीने सुद्धा व्यर्थ असे  कोणतेही पाऊल उचलू नये तर.. फक्त,मी, एक चांगले काम करीत आहे. हीच, नि:स्वार्थ पणाची भावना आपल्या मनात असली पाहिजे. 

सौ. संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
--------------------------------------------

 ज्ञानेश्वरीतील   सुंदर  प्रतिमाने


मग  अज्ञानांध  केवळ  । तेणे  अप्लाविजे    सकळ । तेथ  बुद्धी  होय
व्याकुळ  । ह्दयामाजी  ।।


      जैसे  जात्यांधा  पळणी  पावे । मग
ते  काकुळती  सैरा  धावे । तैसी  बुद्धीसि
होती  भंवे ।  धनुर्धरा ।।

        ऐसा  स्मृतीभ्रंशू  घडे  । मग  सर्वथा
बुद्धी  अवघडे । तेथ  समुळ  हे  उपडे ।
ज्ञानजात ।।

       
        
       मग  केवळ  अज्ञान  अंधता  होऊन
त्या द्वारे  सर्व  व्यापले जाते.  त्या वेळी
अंतरात  बुद्धी ही  व्याकुळ  होते . आंधळी
होते .मग  तो  परमार्थ  प्राप्तीस  सर्वथा
आचवतो.  प्राप्ती पासून  दूर  जातो .

       जसा  जन्मांधाला  पळण्याचा  प्रसंग
प्राप्त   झाला  तर  तो  अगतिकतेने  दीन
होऊन  सैरावैरा  धाऊ  लागतो . त्या प्रमाणे  हे  अर्जुना  मग  बुद्धीला  भ्रमण
होते  ।।

       अशा  रितीने  बुद्धीला  स्मृती भ्रंश
झाला  म्हणजे  मग  बुद्धी  सर्वतोपरी
घोटाळ्यात  पडते .  आणि  मग  सर्व
ज्ञान  समूळ  नष्ट  होते .

        
       सौ.  शैलजा  जाधव (पाटील)
           चांदवड   नासिक
------------------------------------
 विचारधारा

एक गोष्ट,सर्वांनाच चांगल्याप्रकारे माहीत आहे ...  ती म्हणजेच दुसऱ्यांकडे बोट दाखविल्यानंतर आपल्या कडे चार बोटे कायमचं बघत असतात. तरी सुद्धा कुणाच्याही डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही.खरच खूप शोकांतिका आहे.  पण, अशीच वारंवार जर.... सवय लागली तर.... एक दिवस आपल्या पाठीशी कुणाची  बोटे तर....सोडाच पण मदतीचा हात सुद्धा  भेटणार नाही. या विषयावर आपणचं एकदातरी नक्की विचार करून बघावे. 

सौ. संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा