Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

शहरी वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी मोदींकडून ट्विटरचा वापर


शहरी वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी मोदींकडून ट्विटरचा वापर

शहरी वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी मोदींकडून ट्विटरचा वापर



२०१९ च्या निवडणुकीबाबत संशोधनातून बाब उघड


२०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी भारतातील शहरी मध्यमवर्गाला आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवाद व ठोस संस्कृतीवादाचा पुरस्कार ट्विटरच्या माध्यमातून केला, असे एका संशोधनात दिसून आले आहे. भारतीय वंशाचे प्राध्यापक अभिजित मुजुमदार यांनी सांगितले, की याबाबत इंटरनॅशनल कम्युनिकेशन रीसर्च जर्नलमध्ये शोधनिबंध प्रकाशित झाला असून त्यात २०१९ मध्ये भारतातील नेत्यांनी ट्विटरचा वापर कसा केला यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

मिसुरी येथील पार्क विद्यापीठातील सह प्राध्यापक अभिजित मुजुमदार यांनी म्हटले आहे, की नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा  निवडणुकीत ७४ दिवसांच्या काळात ट्विटरचा वापर कसा केला यावर आम्ही संशोधन केले आहे. ‘ट्विटिंग टू विन -अ‍ॅनलायजिंग सोशल मीडिया यूज इन इंडिया २०१९’ असे शोधनिबंधाचे नाव आहे. इतर संशोधकात उत्तर प्रदेशच्या सर रामस्वरूप मेमोरियल संस्थेचे डॉक्टरेट विद्यार्थी भावना वाल व उमना अँजलिन यांचा समावेश आहे. अँजलिन या टेनिसी विद्यापीठातील स्कूल ऑफ अ‍ॅडव्हरटायझिंग अँड पब्लिक रिलेशन्स संस्थेच्या माजी विद्यार्थी आहे. मोदी यांनी ४१ टक्के ट्विटस संदेश हे सभांमधील वक्तव्यांवर केले, तर १७ टक्के ट्विट संदेश हे राजकीय विरोधकांना उद्देशून होते. १३ टक्के संदेश राष्ट्रवादाशी संबंधित होते. पाकिस्तान विरोधातील हल्ल्याच्या संदर्भात राष्ट्रवादाची लाट तेव्हा निर्माण करण्यात यश आले. प्रचार काळात मोदींनी दिवसाला १० ट्विट संदेश पाठवले. तुलनेने राहुल गांधी यांचा ट्विटरचा फारसा प्रभावी वापर झाला नाही. काहींच्या मते मोदींनी विकासाच्या मुद्द्यावर फार थोडे ट्विट संदेश केले.

.................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा