Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

“उगाच मला डिवचू नका!,” भाजपाच्या ज्येष्ठ खासदाराचा मोदी सरकारला घरचा आहेर


Do Not Provoke Me Senior BJP MP Warns Modi Government gst 97

भाजपा नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा आणि भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्यात सध्या मोठं ट्विटरवॉर रंगलं आहे. अवघ्या एका फोटोवरून सुरू झालेला हा वाद आता व्ही.पी.सिंग यांच्या सरकारपर्यंत पोहोचला आहे. खरंतर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे सुब्रमण्यम स्वामी हे वारंवार आपल्या पक्षाला, सरकारला घरचा आहेर देत असतात. याच पार्श्वभूमीवर, सध्या सुब्रमण्यम स्वामी हे त्यांच्याच सरकारच्या परराष्ट्र आणि वित्त धोरणांच्या विरोधात लिहीत आहेत. दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांच्या या भूमिकेमुळे भाजपा देखील अस्वस्थता आहे. परंतु, सुब्रमण्यम स्वामी या गोष्टींची फारशी चिंता करत नाहीत.

उलट सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारला प्रत्यक्षपणे एक इशाराच दिला आहे. “मी एका मताने व्हीपी सरकार पडलं होत. उगाच मला डिवचू नका”, असं स्वामी यांनी बजावलं आहे. झालं असं की, भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी एक फोटो शेअर केला. यावेळी बग्गा यांनी सुब्रमण्यम स्वामींवर विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोप केला. परंतु, नंतर तो फोटो बनावट असल्याचं समोर आलं. या खुलाशानंतर आता सुब्रमण्यम स्वामी यांनी बग्गा यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. इथपासून या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू झालेला हा वाद काही शमण्याचं नाव घेत नाही. कारण, आता हे शाब्दिक युद्ध थेट सरकार पाडण्यापर्यंत जाऊन पोहोचलं आहे.

धडा घ्या…उगाच मला डिवचू नका!

वादादरम्यान एक प्रत्युत्तर देताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, “मी व्हीपी सिंग यांचं सरकार पाडलंही आहे आणि राजीव गांधींच्या पाठिंब्याने चंद्रशेखर यांचं सरकार बनवलंही आहे. त्यानंतर मी भाजपाविरोधात पीव्हीएनआर सरकारला मदत देखील केली. ह्यातून धडा घ्या. उगाच मला डिवचू नका. मी आरएसएस आणि विहिंपच्या आशीर्वादाने मी भाजपामध्ये सामील झालो आहे. विचारधारा महत्त्वाची आहे.” पुढे बग्गा यांनी स्वामींच्या विरोधात एक ट्विट केलं. “या धमक्या दुसऱ्या कोणाला तरी द्या. हे मोदी आहेत. त्यांना संपवायला असे तुमच्यासारखे ३६०० आले आणि गेले”, असंही बग्गा म्हणाले.

रंगलं ट्विटरवॉर

सुब्रमण्यम स्वामी यापूर्वी म्हणाले होते की, “बग्गा भाजपामध्ये येण्यापूर्वी अनेक वेळा तुरुंगात गेले होते. जर हे सत्य असेल तर जे.पी. नड्डा यांना माहिती असायला हवं.” त्यावर प्रत्युत्तर देत बग्गा म्हणाले, “माझ्यावरचे आरोप सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे ४८ तास आहेत.” दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये मोठं ट्विटरवॉर पाहायला मिळत आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मात्र, आतापर्यंत पक्षाने या दोघांच्या वादाबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा