
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक
२०१९ पासून आतापर्यंत १ लाख ४९ हजार ७८० प्रकरणे
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नये, असा नियम असतानाही रिक्षा, टॅक्सी, प्रवासी बस आणि खासगी वैयक्तिक वाहनांतून प्रवास करताना हा नियम धाब्यावर बसविला जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधात मुंबई महानगरात जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२१ पर्यंत १ लाख ६९ हजार ४१५ गुन्हे दाखल झाले आहेत. यात एकटय़ा मुंबईतच १ लाख ४९ हजार ७८० गुन्हे असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. त्यापाठोपाठ पालघरमध्ये या नियमाला तिलांजली दिली जात असून त्यानंतर ठाणे, नवी मुंबईचा क्र मांक लागतो.
क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक के ल्याने अनेकदा अपघातांनाही निमंत्रण दिले जाते. यात काहींचा जीवही जातो. त्याला आळा बसावा यासाठी वाहतूक पोलीस, आरटीओकडून कारवाईही के ली जाते. परंतु या नियमाला अनेकांकडून हरताळ फासला जातो. यात रिक्षा, टॅक्सी आणि छोटय़ा प्रवासी बस आघाडीवर असतात. करोनाच्याही आधी हा नियम पाळला जात नसतानाच करोना काळातही त्याकडे दुर्लक्षच के ले जात होते. रिक्षातून तीनऐवजी एक किंवा दोन प्रवासी, टॅक्सीतून दोन प्रवासी यासह अन्य वाहनांसाठीही नियमावली आखून दिल्यानंतरही चालकांकडून बेशिस्तीचे वर्तन दाखविण्यात आले. आताही मुंबईबरोबरच, ठाणे शहर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पालघरमध्येही तीच स्थिती आहे.
महामार्ग वाहतूक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत २०१९ मध्ये ७४ हजार २२९ गुन्हे दाखल होते. २०२० मध्ये ४३ हजार २८६ असतानाच २०२१ मध्ये हीच संख्या ३२ हजार २६५ असल्याचे सांगण्यात आले. पालघरही यात आघाडीवर असून याच कालावधीत ६ हजार ५६५ गुन्हे आहेत. तर ठाणे शहरात आतापर्यंत ४ हजार १४८, नवी मुंबईत ३ हजार ६०५ आणि ठाणे ग्रामीणमध्ये ४३३ आणि मीरा भाईंदरमध्ये ४ हजार ८८४ गुन्हे असल्याचे सांगण्यात आले.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
0 comments :
टिप्पणी पोस्ट करा