Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

थोरात, पटोले फडणवीसांच्या भेटीला

 

थोरात, पटोले फडणवीसांच्या भेटीला

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

मुंबई : राज्यसभा पोटनिवडणुकीत भाजपने माघार घ्यावी म्हणून विनंती करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेतली.

राजीव सातव यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार उभा केला आहे. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असून, राज्यसभा  निवडणुकीत खुल्या पद्धतीने मतदान होत असल्याने मतांच्या फाटाफुटीला फारसा वाव नाही.

भाजपने माघार घेऊन ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून थोरात व पटोले यांनी फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यापूर्वी विद्यमान खासदार व आमदाराच्या निधनानंतर राज्यसभा व विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनिवरोध झाल्याकडे थोरात यांनी फडणवीस यांचे लक्ष वेधले.

उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत सोमवारपर्यंत आहे. सत्ताधारी पक्षाकडून प्रस्ताव आल्यास माघारीबाबत विचार करू, असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केले होते.

खुल्या पद्धतीने मतदान असल्याने भाजपही फार काही गंभीर नसल्याचे सांगण्यात येते. भाजपने पहिल्या फळीतील किंवा तगडा उमेदवार  रिंगणात उतरविलेला नाही. राज्यसभा पोटनिवडणुकीकरिता काँग्रेसच्या रजनी पाटील तर भाजपचे संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

..........
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा