Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

कांदा उत्पादनासाठी व्यवस्थापन गरजेचे

 


कांदा उत्पादनासाठी व्यवस्थापन गरजेचे

सततची मागणी आणि अचानक वाढणारे दर पाहून कांदा पिकाचे शेतकऱ्यांना सतत आकर्षण राहिलेले आहे. देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्र यामुळेच अव्वल आहे. मात्र स्थानिक उत्पादकांसमोर आता देशांतर्गत स्पर्धा हळूहळू वाढत आहे. अशावेळी स्पर्धेत गुणवत्तेला वाव मिळतो. त्यामुळे दर्जेदार कांदा उत्पादनाची दक्षता घ्यावी लागणार आहे.

अकस्मात मिळणारे लक्षणीय दर पाहून देशभरातील शेतकरी कांद्याकडे आकर्षित होत आहे. देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्र अव्वलच आहे. मात्र स्थानिक उत्पादकांसमोर देशांतर्गत स्पर्धा हळूहळू वाढत असल्याचे नाकारता येणार नाही. स्पर्धेत गुणवत्तेला वाव मिळतो. त्यामुळे दर्जेदार कांदा उत्पादनास प्राधान्य देऊ न समीकरण चुकणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा ३७ टक्के हिस्सा आहे. राज्यात जवळपास एक लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते. नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा या भागांत पूर्वीपासून उत्पादन घेतले जाते. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांत कांद्याची लागवड वाढत आहे. या वर्षी उन्हाळी कांद्याचे समीकरण चुकले. गतवर्षी त्यास प्रचंड दर मिळाले होते. त्याची अनेकांना भुरळ पडली. महागडे बियाणे खरेदी करीत मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली. प्रचंड उत्पादन झाले. साठवणूक करूनही घसरणीने अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याची उत्पादकांची भावना आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त झाल्यानंतर दुसरे काही अपेक्षित नव्हते. यातून एक धडा घ्यायला हवा. ‘नाफेड’चे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर त्यावर बोट ठेवतात. ज्या वर्षी उन्हाळ कांदा कमालीचा भाव खातो, त्याच्या पुढील वर्षात त्याची बेताने लागवड करावी. म्हणजे गडगडणाऱ्या दराचा कमीतकमी फटका बसेल. कांद्याचे गणित चुकण्याचे हे कारण आहे. बाजारभाव पाहून लागवड होते. दर नसल्याने खरीपच्या लागवडीवर परिणाम होऊ  शकतो. त्यामुळे उत्पादन कमी झाल्यास पुढील काळात टंचाई निर्माण होऊ न दर वधारू शकतात अशी शक्यता पडताळून नियोजन करायला हवे.

नाशिकसह अनेक भागांत पावसाचे उशिराने आगमन झाले. त्यामुळे खरीप कांद्याची रोपे विलंबाने तयार झाली. लागवडीवेळी पाऊ स होईल, या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. ज्यांच्याकडे विहीर किंवा इतर पर्याय होते, त्यांनी लागवड केली. इतरांना प्रतीक्षा करावी लागली. दुसरीकडे काही भागात लागवडी झाल्या, पण तिथे कित्येक दिवस रिमझिम सुरू राहिली. जमिनीतील ओलाव्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वाढला. हंगाम एकच, पण समस्या परस्परविरोधी अशी सध्याची स्थिती असल्याचे कांदा उत्पादक संघटनेचे प्रमुख भारत दिघोळे सांगतात. कांदा पिकासमोर संकटांची मालिका अव्याहतपणे सुरू असते. वातावरणात थोडेफार बदल झाले तरी कांद्यासाठी ते हानिकारक ठरते. सरकारी धोरणात सातत्य नसल्याचा फटका अनेकदा सहन करावा लागतो. पिकाचे आर्थिक समीकरण जमवण्यासाठी नियोजनात बदल करण्याची गरज आहे.

रासायनिक खतांच्या अतिवापराने जमिनीशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दर्जेदार उत्पादनासाठी जमीन, मातीचे आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. साधारणपणे भुसभुशीत, सेंद्रिय खतांनी परिपूर्ण मध्यम ते कसदार जमीन कांद्याला चांगली मानली जाते. दर्जेदार उत्पादनासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे असते. रोपांची पुनर्लागवड करताना ‘कॉपर ऑक्सी क्लोराईड’ व ‘कार्बोडिझम’च्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवायला हवी. त्याने करप्या रोगाच्या प्रतिबंधास मदत होते. लागवडीआधी प्रति एकर १० टन चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करायला पाहिजे. सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्याची गरज सूक्ष्मद्रव्यांच्या फवारणीतून भागवता येईल. कांदा पिकास नत्र, स्फूरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावी लागतात. नंतर महिनाभराने नत्र द्यायला हवे. कांद्याला नियमित पाणी देणे महत्त्वाचे असते. खरीप हंगामात १० ते १२ दिवसांच्या अंतराने जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यायला हवे. काढणीपूर्वी तीन आठवड्यांअगोदर पाणी बंद करावे. ज्यामुळे कांदा काढणीस तयार होतो.

खरिपात कांद्यावर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसतो. लागवडीनंतर दोन-तीन आठवड्यांनी फॉस्फॉमिडॉन, क्विनॉलफॉस किंवा मोनोक्रोटोफॉस पाण्यात मिसळून फवारणी करायला हवी. पहिल्या फवारणीनंतर तीन, चार आठवड्यांनी दुसरी फवारणी करावी. त्यावेळी तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार उपरोक्त द्रावणात कॉपर ऑक्झिक्लोराईड  पाण्यात मिसळून फवारावे. यंदा जळगावमधील चोपडा, धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यात पिळ पडणाऱ्या रोगाचा समावेश आहे. लागवडीसाठी रोप रोगमुक्त असावे. मातीची गुणवत्ता ही पीक संरक्षणात मुख्य अडचण ठरते. त्यामुळे जमीन, मातीचे आरोग्य सुधारणे गरजेचे असल्याचे एनएचआरडीएफचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. सतीश भोंडे अधोरेखित करतात. अतिवृष्टीत जमिनीचा वरचा थर वाहून जातो. त्या अशक्त होतात. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी जैविक खतांचा वापर वाढवायला हवा. रोपे लावण्याऐवजी पेरणीद्वारे कांदा लागवड करून उत्पादन कालावधी कमी करता येतो. पुढील काळात खतांचा योग्य वापर, पारंपरिक पध्दतीत बदल करण्याची मानसिकता ठेवावी लागणार आहे.

कांद्याचे दर हे देशांतर्गत मागणी, उत्पादन, निर्यात आदींवर अवलंबून असतात. बदलत्या वातावरणाने जास्तीची औषधे-खते द्यावी लागतात. करोनाच्या सावटाचा कांद्यावर झालेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम अद्याप कायम आहे. हॉटेल, ढाबे, लग्न व तत्सम सोहळे यासाठीची कांदा खरेदी पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. इतर देशांमध्ये उत्पादन होत असल्याने निर्यात फारशी वाढली नाही. शासनाने कांदा साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. शासकीय योजनेचा अनेकांनी लाभ घेतला. यामुळे उत्पादकांची कांदा साठवणुकीची क्षमता वाढली. दुसरीकडे व्यापाऱ्यांची साठवणूक कमी झाली. नफ्याचे गणित जुळवण्यासाठी ते दरावर नियंत्रण राखतात. याचा एकत्रित परिणाम उन्हाळ कांद्यावर झाल्याचे लक्षात येते. ही परिस्थिती पुढील महिन्यात कदाचित बदलू शकते. पावसामुळे इतर राज्यांमध्ये रोपांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे स्थानिक कांद्याच्या मागणीत पुन्हा वाढू होऊ  शकते. दरात कमालीचे चढ-उतार असूनही शेतकरी या नगदी पिकाला पसंती देतात. लागवडीचे क्षेत्र वाढवितात. किमान क्षेत्रातून जास्तीतजास्त कांदा उत्पादन यावर भर देण्याची गरज आहे.

................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा