Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राजापूरातील अणसुरे गावातील एका मंदिराच्या विकास कामाचे भूमिपूजन झाले ते ही निविदा निघालेली नसताना?




 राजापूरातील अणसुरे गावातील एका मंदिराच्या विकास कामाचे भूमिपूजन झाले ते ही निविदा निघालेली नसताना? 


शिवसेनेच्या दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत झाला हा भूमिपूजन सोहळा? 

राजकिय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण


रत्नागिरी प्रतिनिधी:-

राजापूर तालुक्यातील अणसुरे गावातील एका मंदिराच्या विकास कामाची कोणत्याही प्रकारची निविदा काढलेली नसताना एप्रिल महिन्यात शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला असल्याची जोरदार चर्चा या परिसरात सुरू आहे. सदर मंदीराच्या विकास कामासाठी ग्रामीण यात्रास्थळ योजनेतून सुमारे पंधरा लाख व पाच लाख एवढा निधी मंजूर झालेला आहे. मात्र ग्रामपंचायत स्तरावर या कामाची निविदा अद्याप काढण्यात आलेली नाही. तसेच कोणत्याही प्रकारचा कार्यारंभ आदेशही देण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे या मंदिराच्या संबंधित प्रशासनाच्या किंवा विश्वस्त यांच्या वतीने अधिकृत निधीची मागणी किंवा प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केला होता का?, सादर केला नसल्यास सदरचा निधी मंजूर झाला कसा असाही सवाल उपस्थित केला जात आहे. मंदिर प्रशासन अथवा विश्वस्त यांच्यावतीने ग्रामपंचायतीकडे निधिबाबत मागणी पत्र अथवा प्रस्ताव सादर केला होता का? आराखड्यामध्ये या कामाचा उल्लेख झाला कसा असाही सवाल उपस्थित केला जात आहे. निविदा काढलेली नसताना देखील शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा थाटामाटात पार पडला कसा? ही गोष्ट नियमाला धरून आहे का? असे सवाल परिसरातून उपस्थित केला जात आहेत.

..........
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा