Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राकेश चव्हाण यांना आंतर राज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार चिक्कोडी कार्यक्रमात प्रदान

 





राकेश चव्हाण यांना आंतर राज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार चिक्कोडी कार्यक्रमात प्रदान


रत्नागिरी : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (रजि.) बेळगावी तसेच हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी (रजि.) यांच्यातर्फे दिला जाणारा गोवा, कर्नाटक, महाराष्ट्रासाठीचा आंतर राज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार रत्नागिरीचे सामाजिक कार्यकर्ते आणि रत्नागिरी शहर काँग्रेसचे अध्यक्ष राकेश चव्हाण यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार चीक्कोडी येथे ५ सप्टेंबरला झालेल्या कार्यक्रमात राकेश चव्हाण यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल राकेश चव्हाण यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


सामाजिक, शैक्षणिक, शासकीय, निमशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (रजि.) बेळगावी तसेच हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी (रजि.) यांच्यातर्फे हे आंतर राज्य पुरस्कार तीन राज्यांमधील निवडक व्यक्तींना दिले जातात. राकेश चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाची शिफारस त्यांच्या कार्याची माहिती घेण्यात आल्यानंतर संस्थेतर्फे करण्यात आली.


पुरस्कार वितरण सोहळा ५ सप्टेंबर रोजी दुपारी १वाजता अरविंद घट्टी फॉर्म हाऊस, के.एल. ई.इंजिनियरिंग कॉलेज समोर, जोड कुरळी, चिक्कोडी येथे झाला. यावेळी बेळगावचे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, मा.केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर, उद्योगपती सुरेशदादा पाटील, गुलबर्गा जिल्हा पोलिस प्रमुख महेश मेघन्नावर, होमगार्ड विभाग जिल्हा कमांडंट अरविंद घट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

...................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा