Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e


 

काव्यपुष्प

 गुरु शिक्षक

गुरु ने माटी के पुतले को सोना बनाया।
गुरु ने एक एक  शब्द का अर्थ बताया।
गुरु ने हमें शिक्षा  का   महत्व  बताया। 
गुरु ने  फर्ज अदा  हमें  इंसान  बनाया। 
गुरु  ने  परिंदे     को    बाज़    बनाया।
गुरु ने अपनी   मार से मझबूत बनाया।
गुरु ने  लोहे  सा   फौलादी     बनाया।
गुरु ने अपनपढ   को अफसर बनाया। 
गुरु ने हमारा  जीवन  सफल  बनाया। 
गुरु ने हमारा  भविष्य उज्वल बनाया।

   नीक राजपूत
   9898693535
-----------------------------------------------------------------------------------

 म्या शिकनार..….होय गुर्जी.…म्या शिकनार
माह्या मायचं पांग फेडनार ।
पोट राह्यलं उपाशी तरी
मस्तकाले जेवू घालनार ।।

घरच्यायले माह्या शिक्षनाचं
मले ओझं होऊ द्याचं नाई ।
गुर्जी सांगा तुम्ही घरचे काम
मले फुकट शिकवाचं नाई ।।

झाडून काढीन, धुनं धुईन
वाटलंच तं भांडे बी घाशीन ।
 तुमच्या लेकराचे पुस्तक
फाटलेले मी सोता वाचीन ।।

सईन करीन आत्ताचे दुःख
शिकून तं मी मानूस व्हईन? ।
तुमच्या घरचे तवा तरी गुर्जी
नाव माह्यं मंग मानानं घेईन ।।

काया हावो ना मी रंगानं गुर्जी
डरेस बी माह्या कायाभोर हाय ।
साबन लावाले भेटत नाई म्हून
हाय नं माह्ये मयकटलेले पाय ।।

पन गुर्जी मन पाह्यलं का माह्यं 
ते तं तुमच्यासारखाच हाय ना ।
तरी बी लोकायसाठी अजून बी
मी तं पोरगा परकाच हाय ना ।।

बदलावाचं हाय मले रीत जगाची
माह्येसारख्याले मले जगवाचं हाय ।
शाया शिकवून त्यायले बी देशाचा
खरा नागरिक आज बनवाचं हाय ।।

गुर्जी शिकवा मले मारू मारू लैच
 काडीनं भाग्यरेषा पळले पाह्यजे ।
माह्या मायच्या डोयात मले उद्या
खुशीचे आसू दिसले पाह्यजे ।।

शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
-----------------------------------------------------------------------------------


संकल्प.……

जिद्द मनामध्ये । मनगटी बळ ।
आयुष्य सकळ । देशासाठी ।।

सुवर्ण दिवस । देशाला दावेल ।
नित्य हसवेल । गरिबांना ।।

आनंदी आनंद । देशात दिसेल ।
महिला असेल । सुरक्षित ।।

कर्म सगळ्यांचे ।  असेल चांगले ।
कोणीच थकले । नसणार ।।

 राहील सर्वांना । अक्षराचे ज्ञान ।
वाचेल विज्ञान । सर्वजण ।।

प्रयत्नांना फळ । नक्कीच येईल ।
सैनिक होईल । बंधू माझा ।।

कोणी उच्च-निच । राहणार नाही ।
इथे लोकशाही । नटलेली ।।

मनात संकल्प । हातात लेखनी ।
नेहमी वदनी । "जय हिंद" ।।

अजु देशासाठी । जगतो, मरतो ।
नेहमी उरतो । लेखणीत ।।


शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी
ता.दारव्हा, जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७
-----------------------------------------------------------------------------------
..प्रभा..

आनंदला कण कण
सृष्टी ल्याली चैतन्य,
दान प्रकाश घेऊन
झाले चराचर धन्य.

..नखाते ज्ञानेश्वर..
      .परभणी.
-----------------------------------------------------------------------------------
शामलाक्षरी

जीवन घडवती शिक्षक,
विद्यार्थ्यांना देती संजिवनी
जीवन खळाळते स्वच्छंदी
यश मार्ग दाखवी जीवनी ॥
जीवन- आयुष्य ,पाणी

सौ.शामला पंडित(दीक्षित )
प्रणाली प्रकाशन, चिंचव
-----------------------------------------------------
शिक्षिका आणि विद्यार्थिनी

माझ्यात लपलेली असते
नेहमीच एक विद्यार्थिनी
आवड असते तिला शिकण्याची
नि प्रत्येक गोष्टीतल्या नाविन्याची
मी शिकवते तेव्हा ती असते
समोरच्याच बाकावर
लक्ष ठेऊन असते
माझ्या शब्दाशब्दावर
पटत नसतो तिला माझ्या
शिकवण्यातला चालढकलपणा
प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि
पाहिजे असतो सविस्तरपणा
चूकीचे माझ्या होतील वाईटपरिणाम
हेच पटवित असते जणू साक्षात
मी देते जेव्हा जिजा अहिल्या
सावित्रिचे संदर्भ
फुलत जातो तिच्या अंगाअंगातून
स्वत्वाचा स्वाभिमान 
आणि दिसतो एक गर्व
सिता द्रौपदी यांचायावरचा
ऐकते जेव्हा ती अन्याय
वळतात तिच्या मुठी आणि
डोळ्यात पेटतो एक अंगार
त्याच डोळ्यात चमकतात अश्रू
आणि ज्योत प्रेमाची तेवते
हिरकणीच्या बाळाची गोष्ट
जेव्हा मी सांगते
तिच्याशी माझे नाते
जन्मजन्मांतरीचे
साथ असते नेहमीचीच
आणि ओढ एकरुप होण्याची
अशी मी शिक्षिका आणि
ती एक विद्यार्थिन…

नवीन पिढीसाठी योगदान
हीच इच्छा मनी
माझ्यात लपलेली..........

 सौ. शैलजा जाधव (पाटील मॅडम)
             
------------------------------------------------------------------------------
सुरम्य सृष्टी
सूर्य तेजात न्हाली
अवतरली

मुग्ध मधुर
स्वर पक्षांचे कानी
मनुजा मानी

फुले सुगंधी
हवे सवे खेळती
जीवा सांगती

सौ उषा राऊत
-------------------------
 शब्दगंध..

जीवनाच्या प्रत्येक क्षणी 
अनुभव हा येत असे
शिक्षकाचे काम करुनी
क्षणोक्षणी मार्ग दाखवीत असे

सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )
पुणे.
----------------------------------------------------------
  आजची   चारोळी

         गुरु  ज्ञानाचे अमृत
       गुरु जीवना देई आकार
          गुरु ईश्वराचे रुप
        गुरू निर्गुण निराकार

   सौ. हेमा जाधव, सातारा
------------------------------------------------------------
 नाते गुरू शिष्याचे

पेशा शिक्षक आमचा
शिकवणे हा स्वधर्म 
सुसंगती सदा घडो 
ऐसें अद्वितीय कर्म

सदोदित ज्ञानार्जन
जग जीवन आधार
माझे विद्यार्थी दैवत 
भविष्याचे शिल्पकार

नकळत विद्यार्थी हे 
शिकवून जाती मना 
नम्र सुसज्ज विनय
होतो मानत तयांना

व्हावे ते उच्च शिक्षित 
देती ज्ञान ग्रंथ गुरू 
नेक पिढ्यांना मिळावे
साहाय्यक कुलगुरू 

नाते ते गुरू शिष्याचे 
कोणामध्ये रे शोधावे
गोड आशिष आमचे
ऑनलाइनच घ्यावे

- नयन धारणकर
-----------------------------------------------------------------------------------

 माझा बाप शेतकरी

माझा बाप शेतकरी
काळया मातीत राबतो
घाम गाळून मोत्याचे
धन धान्य पिकवितो

भल्या पहाटे उठून
वाट बंधाची धरतो
मीठ मिरचीचा ठेच
कांदा भाकर बांधतो

एका हाती बैलजोडी 
खांद्यावर ते पावडे
खाकी शिदोरीची झोळी
अनवाणी पायी पडे

दिसभर शेतावर
ऊन घेई डोक्यावर
रक्त आठवे उन्हात
पीक घेऊ थोडं फार
 
भाव ना मिळे पिकास
शेतकरी चिंतातुर
अख्या जगाचा पोशिंदा
चढे बाप फासावर

संगिता रामटेके गडचिरोली
--------------------------------------------------------------------------

 वाटा शिक्षणाच्या 

शिक्षणाची वाट धरताना घाबरलो हिरमुसून
मित्रांमध्ये बागडलो सर तुम्ही होता म्हणून

त्या वाटेवर चालताना ठेच लागून धडपडून
तोल सावरून उठलो सर तुम्ही होता म्हणून

कधी वाचता न येणाऱ्या विविध पुस्तकांशी
मैत्री करायला शिकलो सर तुम्ही होता म्हणून

माझ्यापेक्षा असलेल्या हुशार विद्यार्थ्यांमध्ये 
आजपर्यंत टिकलो सर तुम्ही होता म्हणून

आपल्या शाळेतील शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांचा 
आदर करायला शिकलो सर तुम्ही होता म्हणून

शाळेतील दहावीपर्यंतच्या शिक्षणात यशस्वीरीत्या 
उत्तीर्ण नेहमी होत गेलो सर तुम्ही होता म्हणून

आज दहावीनंतरचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून 
अंतिम टप्प्यात पोहोचलो सर तुम्ही होता म्हणून

शिक्षणाच्या प्रवासात कधी चिंताग्रस्त होऊन 
निराश झालो नाही की कधी हार मानली नाही 
सर तुम्ही होता म्हणून

शिक्षणाच्या वाटा प्रत्येकवेळी शोधताना आयुष्याच्या
खाचखळगी भरून काढल्या सर तुम्ही होता म्हणून

विविध शिक्षणाच्या वाटा पार करून आशीर्वादाने 
तुमच्या भविष्यात जिथे कुठे असेल सर फक्त 
तुम्ही होता म्हणून

- नयन धारणकर

आजपर्यंत मला ज्या ज्या शिक्षकांनी इथवर पोहोचण्यास हातभार लावला ज्यांच्यामुळे आज मी इथे आहे त्या सर्व शिक्षकांना समर्पित🙏🏻💐
----------------------------------------------------------------------------
..प्रभा..

चढली क्षितिजावर लाली
झाले तांबूस पिवळे आकाश,
आल्या गुलाल उधळीत दिशा
सृष्टी ल्याली रूपेरी प्रकाश.

..नखाते ज्ञानेश्वर..
      .परभणी.
------------------------------------------------------------------
श्रावण मास
सूर्य किरणे
पसरली चौफेर
धरा सुंदर

कोमल छाया
संजीवनी जीवास
श्रावण मास

नव चैतन्य
देई  मनामनास
नसे आभास


सौ उषा राऊत
------------------------------------------------------------------------------
सण बैलपोळ्याचा 

या श्रावणमासामध्ये 
उगवलाय दिवस सोन्याचा
पिठोरी अमावस्येला, 
सण आलाय बैलपोळ्याचा ||ध्रु|| 

बैलांना स्नान घालून 
सजवलंय शाल पांघरून
घातल्या रुद्राक्षाच्या माळा 
पायी घुंगरू बांधून
घातलाय गावकऱ्यांनी 
घाट मिरवणुकीचा ||१|| 

बैलांचे स्वागत करण्या 
गावा लाविले पताके
आगमनाप्रित्यार्थ 
आम्ही वाजवले फटाके
झालाय गावात गजर 
ढोल ताशांचा ||२|| 

बैलांच्या कार्यासाठी 
केले लाड गोड कौतिक
चालीरीतीत पूजन करुनी 
दिला नैवेद्य पौष्टिक
आजचा उत्सव ही 
मोठा शेतकऱ्यांचा ||३|| 

नयन धारणकर
--------------------------------------------------------

बैलपोळा 

आला सण बैलपोळा 
ढवळ्या पवळ्या जोडीचा 
बळीराजाचा मित्र असे हा 
कष्ट करणाऱ्या बैल जोडीचा  

शेतात तू रोज राबतो  
अंग आपले  झिजवून 
पिके फुलती तुझ्याच घामाने 
धरती जाते मोहरून 

तुझ्याचमुळे घर नांदते 
आशीर्वाद तुझा देई 
तुझ्या नावाचा सण येतो 
शेतकरी बांधव आनंदी होई 

तुझ्या अपार कष्टाने 
बहरते माझी भुई 
एक दिवसाच्या तुझ्या पूजेने 
करू कशी मी उतराई

सौ मधुरा कर्वे. ( भावगंधा )
पुणे. 
9168914263
--------------------------------------------------------

 चेहरा हमे सोने नही देता

तुम्हारा  हमे  मीठा ख्याल  सोने नही देता
करवटें  कितनी  बदले हमें सोने नही देता

पलकों  बैठा  रहता  है  नाही  आँखे  बंध 
होने  देता  नाही हमें पलक झपकाने देता 

दिनमें दफ्तर का काम और रातों को होठ
जपे तेरा जो  नाम जो हमे सोने नही देता 

इश्क किया था या बेवफाई पता नही क्या
कसूर  था मेरा  जो  हमें तू सोने नही देता 

दोनों एक से  उपर  आसमानी  चाँद और 
नीचे  हमारी जान जो हमें सोने  नही देता 


    नीक राजपूत 
   9898693535


 बैलपोळा
आला बैलपोळा त्योहार
शेतकरी बंधू भगिनीचा
आनंद उत्सवाचा सण
पूजन करी बैल जोडीचा

आला पोळ्याचा दिवस
बैलजोडी घालती आंघोळी
सजवून रंग रंगोटी अंगावर
नैवद्य दाखवि पुरण पोळी
 
एक दिवस त्याचा विश्रांतीचा
त्याला म्हणती बैलपोळा सण
भारत कृषिप्रधान, संपन्न देश
पोळ्याचे दिशी बैल जोडीला मान

घरो घरी पक्कावन असे
आदराने बैलाचे पाय धुऊनी 
ओवाळून आरती , हळद कुंकू
खाऊ घाली गोड धोड बनवूनी

पुरण पोळीचा नैवेद्य मानाचा
पक्कवांचा वास चाले घरोघरी
पूजन करी बळीराजाची धनिन
कुळ्याच्या पात्रात  देई पुरण पुरी

रंगी बेरंगी शिंगे  रंगतदार
पाठी ठप्पे, गोल  नक्षीदार
अंगी पाठीवर झुल चमकदार 
गळ्यात घुंगरू माळ मोहोकदार

शेतकरी बंधू माझा येई खुशीत
वर्षभर घेई कष्ट बैलजोडी संग
राब राब राबतो स्वतः शेतकरी
नवे पेहेराव करी बैलजोडी  रंग

मोठा थाठा माठात निघे
हाती बैलजोडी घेऊ चौकात
रांगेत उभे करी तोरणाचे आत
नारा बोलुन पोळा फुटला म्हणत

संगीता रामटेके गडचिरोली
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा