Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

चिपी विमानतळ उद्धाटनाला मुख्यमंत्री कशाला हवेत म्हणणाऱ्या नारायण राणेंचा यु-टर्न; म्हणाले…


चिपी विमानतळ उद्धाटनाला मुख्यमंत्री कशाला हवेत म्हणणाऱ्या नारायण राणेंचा यु-टर्न; म्हणाले…

 

चिपी विमानतळ उद्धाटनाला मुख्यमंत्री कशाला हवेत म्हणणाऱ्या नारायण राणेंचा यु-टर्न; म्हणाले…


काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचे चित्र पहायला मिळाले. हा वाद निवळत असताना तीन दिवसांपूर्वी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख ठरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला यायलाच पाहिजे असं काही नाही, असं राणे म्हणाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी यु-टर्न घेतला आहे. मुख्यमंत्री ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असं त्यांनी म्हटलंय.

“विकासाची प्रत्येक गोष्ट माझं स्वप्नच आहे. सिंधुदुर्गात विमानतळ मी स्वत: बांधलं आहे. मी मंत्री असताना बांधून पूर्ण केलं आहे. हे विमानतळ ९ ऑक्टोबरला सुरू होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. श्रेय कसलं? जे कोण बोलतंय त्यांचं सिंधुदुर्गाच्या विकासात एक टक्क्याचं श्रेय नाही. विमानतळ बांधून मी पूर्ण केलंय त्यामुळे श्रेयाचा प्रश्न येतोच कुठे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्घाटनाला आले तर त्यांचं स्वागत करू, असं राणे टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाले.

यावेळी बोलताना गणेशोत्सवावरील निर्बंधावरूनही नारायण राणेंनी ठाकरे सरकारवर टीका केली. सणांवर निर्बंध असू नयेत, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच फक्त हिंदूंच्याच सणावर असे निर्बंध घालणं योग्य नाही. मी असे निर्बंध मानत नाही. त्यांना काय करायचं ते करू देत, असंही राणे म्हणाले.

काय म्हणाले होते राणे..

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ७ सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाला बोलवणार का?, असा प्रश्न उपस्थित पत्रकारांनी विचारला असता ‘मुख्यमंत्री पाहीजेत असं नाही’, असं उत्तर त्यांनी दिलं. “क्रेडीट घेण्याचं प्रश्नच नाही. मी २०१४ सालापर्यंत विमानतळ बांधून पूर्ण केलं. मी स्थानिक नाही का? आम्ही स्थानिक असल्याने आणि विमानतळ बांधल्याने आमचा अधिकार आहे. पर्यटन जिल्हा आम्ही जाहीर केला. कुणी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेना कोणत्या आधारावर बोलते हे माहिती नाही. मी संबंधित मंत्र्यांशी याबाबत बोललो आहे.”, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले होते.

.................................
------------------------------

www.freshnewz.in


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा