Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

साताऱ्याचे युवक गणपतीपुळे समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू

 


Breaking News : साताऱ्याचे युवक समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू


साताऱ्याचे युवक गणपतीपुळे समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू


रत्नागिरी : गणपतीपुळे येथील समुद्रात पाेहण्यासाठी आलेले पर्यटक बुडाल्याची घटना  (गुरुवार) दुपारच्या सुमारास घडली. बुडालेल्यांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. संबंधित युवक सातारा जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती उपल्बध झाली आहे.
           गणपतीपुळेचा समुद्र नेहमीच पर्यटकांना आकर्षित करीत असताे. येथे आलेल्या युवकांना  समुद्रात पोहण्याचा मोह अंगलट आला. दुपारच्या सुमारास दाेन जण समुद्रात बुडाल्याने एकच गाेंधळ उडाला.

युवक बुडल्याचा गाेंधळ सुरु झाल्याने स्थानिकांनी समुद्राकडे मदतीसाठी धाव घेतली. बुडालेले युवक हे साताऱ्याचे असल्याचे समजते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घडली घटना असावी असे सांगितले जात आहे. दरम्यान या घटनेत दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे तर एकाला वाचवण्यात यश आल्याची प्राथमिक माहिती आहे. संबंधित युवकांची नावे स्थानिकांना अद्याप समजू शकलेली नाहीत.

                 ..........................

------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा