Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड कायम

 


राष्ट्रीय खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड कायम

भुवनेश्वर : बिजू पटनायक बंदिस्त स्टेडियमवर सुरू असलेल्या ४०व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुमार-कुमारी खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजयी घोडदौड कायम राखली.

मुलांच्या गटात महाराष्ट्राने आसामचा १५-१० असा एक डाव राखून ५ गुणांनी पराभव केला. सूरज जोहरे व आदित्य कुदळे यांनी प्रत्येकी ४ गडी बाद करीत दोघांनी प्रत्येकी दोन मिनिटे संरक्षण केले. दुसऱ्या डावात किरण वसावे व भगतसिंग वसावे यांनी अनुक्रमे २.०० व २.१० मिनिटे संरक्षण केले. आसामच्या पप्पू गोगाईने (१.३० मि.) एकाकी लढत दिली.

मुलींच्या गटातील सलामीच्या सामन्यात महाराष्ट्राने आसामवर २४-९ असा एक डाव राखून १५ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. महाराष्ट्राची दिपाली राठोड (२.२०मिनिटे संरक्षण व ६ गुण) व कौशल्या पवार (१.२० व १.४० मिनिटे संरक्षण आणि ५ गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. पहिल्या डावात अश्विनी शिंदे, सरिता दिव्या , जान्हवी पेठे यांनी भक्कम संरक्षण केले.

..........
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा