Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

मंत्रालयाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा प्रयत्न!



मंत्रालयाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा प्रयत्न!

सावंतवाडी:  सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जिल्हा पर्यटन महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये भेट घेतली. महासंघाच्या वतीने 27 सप्टेंबर रोजी मालवण येथे होणार्‍या जागतिक पर्यटन दिन कार्यक्रमाचे त्यांना निमंत्रण दिले. ना. राणे यांनी हे निमंत्रण स्वीकारत कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होणार असल्याची ग्वाही दिली. तसेच जिल्हयाच्या पर्यटन विकासासाठी आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची ग्वाही ना. राणे यांनी या पदाधिकार्‍यांना दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाची मुहूर्तमेढ रोवली त्या अनुषंगाने पुढील काळात रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने पर्यटन व्यवसाय वाढीसाठी आपण प्रयत्न करणार असून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून जिल्ह्यात आणि कोकणात पर्यटनाभिमूख रोजगाराचे कोणते प्रकल्प आणता येतील, यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. पर्यटन महासंघानेही योग्य दिशेने काम करावे जेणे करून सिंधुदुर्गची आंतराष्ट्रीय पर्यटन नकाशावर वेगळी ओळख आपण करू.

................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा