Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रुग्णालय परवाना नूतनीकरणाचा तिढा सुटेना!


रुग्णालय परवाना नूतनीकरणाचा तिढा सुटेना!
रुग्णालय परवाना नूतनीकरणाचा तिढा सुटेना!

मुदत वाढवण्याची खासगी डॉक्टरांची मागणी
रुग्णालय नर्सिंग होम परवाना नूतनीकरण दर तीन वर्षाने करावे लागते. याची मुदत  ३१ मार्चला संपली तरीही करोनामुळे प्रारंभी ही मुदतवाढ जूनपर्यंत व नंतर ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती. आहे मात्र विविध स्तरावर अजूनही अनेक अडचणी असल्याने नूतनीकरण परवान्याची मुदत आणखीन वाढवून द्यावी, अशी मागणी डॉक्टरांकडून होत आहे.

पहिल्या करोना साथीच्या लाटेच्या वेळी शासनाच्या वतीने प्रारंभी खासगी रुग्णालयांना करोना रुग्णावर उपचार करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर खाजगी रुग्णालयांचा सहभाग घेण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या लाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणावर खाजगी रुग्णालयांना सहभागी करून घेतले गेले. यामुळेच राज्यातील अधिकाधिक रुग्णांना उपचार मिळू शकले. शासनाची गरज जेव्हा होती तेव्हा रुग्णालयांना काहीही करून तुम्ही करोना रुग्णांवर उपचार केले पाहिजेत, त्यासाठीच्या लागणाऱ्या सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत, शासनाने घालून दिलेल्या अटीनुसार व दरानुसारच उपचार करावे लागतील अशी बंधने घालण्यात आली. प्राणवायूचा तुटवडा भासू लागल्यानंतर रुग्णालयांनी स्वतङ्म स्वयंपूर्ण होण्याची गरज असून रुग्णालयाचे स्वतङ्मचे प्राणवायू निर्मिमतीचे प्रकल्प सुरू व्हायला हवेत यासाठी सरकार योग्य ती मदत करेल असे सांगण्यात आली.

दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर राज्यातील काही महानगरपालिका कार्यक्षेत्रात ‘नाक दाबले तर तोंड उघडते’ ही भूमिका घेत डॉक्टरांच्या चुकांवर बोट ठेवत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे उद्योग सुरू झाले आहेत,

लातूर महानगरपालिकेने १८० रुग्णालयांपैकी शहरातील ७९ रुग्णालयांना आपले बांधकाम अवैध आहे व ते नियमित करण्यासाठी दंड भरून नियमित करून घ्या अशा नोटीसा बजावल्या. त्या नोटिसांचे आकडे अवाच्या सवा असल्याने डॉक्टर गोंधळून गेले. पालकमंत्री अमित देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वराज, महापालिका आयुक्त, महापौर, उपमहापौर, मनपातील विरोधी पक्षनेते यांच्यासमवेत बैठक घेऊन दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. ३१ ऑगस्टपर्यंत रुग्णालयाच्या नूतनीकरण परवान्याची मुदत होती.

ती मुदत उलटून गेली. दंडाची रक्कम कमी न केल्यामुळे एकाही रुग्णालयाने अद्याप ही रक्कम भरली नाही. त्यामुळे महापालिकेने या ७९ रुग्णालयांना नूतनीकरण परवाना दिलेला नाही. रुग्णालयाचा नूतनीकरण परवाना, त्याच्या अटी व अवैध बांधकाम या दोन स्वतंत्र बाबी आहेत मात्र दोन्हीचा गुंता एकत्र केल्याने प्रश्न अडकलेला आहे.

परवाना नसलेल्या रुग्णालयांमध्ये उपचार होणाऱ्या रुग्णांचा विम्याचा दावा मान्य के ला जात नाही. परिणामी अशा रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे नुकसान होणार आहे. ‘आयएमए’ लातूरच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा काळे यांनी हा प्रश्न लावून धरला. महापालिका स्तरापासून, पालकमंत्री, राज्याचे आरोग्यमंत्री अशा विविध स्तरावर या प्रश्नावर त्या पाठपुरावा करत आहेत. महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक र्गोंवदपूरकर यांनी महापालिकेने रुग्णालयांना दिलेल्या नोटीसाच बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

बहुतांश रुग्णालयांनी बँकेचे कर्ज काढून रुग्णालयाची उभारणी केली. बांधकाम परवाना न घेता कोणालाही बँकेचे कर्ज मिळत नाही. म्हणजे महापालिकेचा परवाना घेऊनच बांधकाम झालेले आहे. ते जर नियमानुसार झालेले नसेल तर जेवढे बांधकाम परवानगीपेक्षा अधिक आहे तेवढेच अवैध ठरवायला हवे. पूर्ण रुग्णालयाचे बांधकामच अवैध अशा पद्धतीची नोटीस देता येणार नाही. जी कायद्यानुसार योग्य नाही. महापालिकेने अवैध बांधकामे वैध करून घेतली पाहिजेत.

दंडाची रक्कम घेतली पाहिजे मात्र कायद्याच्या चौकटीत बसून दंड वसूल केला पाहिजे. महापालिकेची भूमिका चुकीची असल्याचे काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेवकांचेच म्हणणे आहे. महापालिका आयुक्त अमन मित्तल यांनी नियमानुसार नोटिसा बजावलेल्या असून शासन स्तरावर जो निर्णय होईल त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सुधीर मुनगुंटीवार यांनी रुग्णालय नूतनीकरण परवानगीचा प्रश्न आपल्या स्तरावर पूर्वीच निकाली काढला आहे. डॉक्टरांना अकारण त्रास होऊ नये यासाठीची काळजी तेथे घेण्यात आली आहे. अशी काळजी अन्यत्र का घेतली जात नाही, असा सवाल उपस्थित के ला जातो.

अडचणी समजून घेण्याचा गरज

दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असेल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत तेव्हा स्वाभाविकपणे खासगी रुग्णालयांचा करोना रुग्णांच्या उपचारासाठी अधिक व्यापक प्रमाणात सहभाग लागणार आहे. तो सहभाग मिळवायचा असेल तर डॉक्टरांच्या अडचणीदेखील समजून घ्यायला हव्यात. सतत कायद्याचा बडगा दाखवून काम करून घेणे हे काही वेळा योग्य आहे. त्याचा प्रयोग वारंवार व्हायला लागला तर नवे प्रश्न निर्माण होतील. डॉक्टरांचा नूतनीकरण परवाना लवकर मिळावा यासाठी पालकमंत्री अमित देशमुख हेही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहेत.

..................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा