Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. टी. पद्मानाभन यांचे निधन


ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. टी. पद्मानाभन यांचे निधन

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. टी. पद्मानाभन यांचे निधन


केरळ विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी आणि पदव्युत्तर पदवी संपादन के ल्यानंतर पद्मानाभन मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेशी (टीआयएफआर) जोडले गेले.


 गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र या क्षेत्रातील योगदानासाठी जगभरात ओळख निर्माण के लेले ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. टी. पद्मानाभन (वय ६४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. डॉ. पद्मानाभन आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी  केंद्रात (आयुका) मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी वासंती, कन्या हंसा असा परिवार आहे. डॉ. पद्मानाभन यांच्यावर औंध येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

केरळ विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी आणि पदव्युत्तर पदवी संपादन के ल्यानंतर पद्मानाभन मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेशी (टीआयएफआर) जोडले गेले. त्यानंतर त्यांनी टीआयएफआरमध्येच १९८० पासून अध्यापन सुरू के ले. १९८० ते १९९२ या कालावधीत त्यांनी संस्थेतील विविध पदांवर काम के ले. तर केंब्रिज येथील खगोलशास्त्र संस्थेतही वर्षभर काम के ले. १९९२ मध्ये ते आयुकामध्ये अधिष्ठाता म्हणून रुजू झाले. गुरुत्वाकर्षण, विश्वरचनाशास्त्र अशा क्षेत्रांत त्यांनी के लेले संशोधन जगभरात महत्त्वपूर्ण मानले जाते. डॉ. पद्मानाभन यांनी ‘नोशन ऑफ कॉस्मिक इन्फॉर्मेशन’ ही नवी संकल्पना मांडली.  खगोलशास्त्रातील त्यांच्या संशोधन कार्याचा २००७ मध्ये पद्माश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्याशिवाय त्यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, इन्फोसिस सायन्स फाउंडेशन पुरस्कार असे विज्ञान क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले होते.

डॉ. पद्मानाभन यांचे भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र विषयांतील तीनेशहून अधिक शोधनिबंध नामांकित संशोधनपत्रिकांमध्ये प्रसिद्ध झाले होते. तसेच पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसह आफ्टर द फस्र्ट थ्री मिनिट्स : द स्टोरी ऑफ अवर युनिव्हर्स, स्ट्रक्टरल इन्फॉर्मेशन इन युनिव्हर्स, अ‍ॅन इन्व्हिटेशन टू अ‍ॅस्ट्रोफिजिक्स अशा अनेक पुस्तकांचे लेखनही त्यांनी के ले.

प्रा. टी. पद्मानाभन यांनी सापेक्षतावाद, थर्मोडायनॅमिक्स अशा क्षेत्रात त्यांनी के लेले संशोधन जगभरात मान्यता पावले आहे. ते अभ्यासक, संवादक, उच्च दर्जाचे संशोधक होते. त्यांच्या निधनाने खगोलशास्त्र संशोधनामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. – डॉ. के . विजयराघवन, मुख्य वैज्ञानिक सल्लागार

प्रा. टी. पद्मानाभन यांचे निधन हा आयुकाच्या इतिहासातील आणि भारतीय वैज्ञानिक समुदायासाठी सर्वांत दु:खद दिवस आहे. त्यांनी संशोधनाचा वारसा आणि पाठ्यपुस्तके  मागे ठेवली आहेत. – डॉ. सोमक रायचौधुरी, संचालक, आयुका

.......................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा