Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा
Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शुक्रवार 17 सप्टेंबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येणार आहे.


मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुताम्यांना करणार अभिवादन


औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शुक्रवार 17 सप्टेंबर रोजी औरंगाबाद दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री श्री.ठाकरे सकाळी 7.30 वाजता मुंबईहून विमानाने औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. सकाळी 8.25 वाजता त्यांचे चिकलठाणा विमानतळ येथे आगमन होणार आहे.

सकाळी 8.45 वाजता मुख्यमंत्री हे सिद्धार्थ उद्यान येथे स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्तीसंग्रामातील हुताम्यांना अभिवादन करतील. त्यानंतर सकाळी 9 वाजता त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. सकाळी 9.30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि पैठण येथील संतपीठाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री सकाळी 10.40 वाजता शेंद्रा येथील ऑरिक सिटी आणि डीएमआयसी अंतर्गतच्या विविध कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता ते चिकलठाणा विमानतळ येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत.

..........................
------------------------------

www.freshnewz.in


Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा