Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

आजची भावलेली कविता-आमचा शिवबा...


आजची भावलेली कविता

आमचा शिवबा...


सह्याद्रीच्या कडे कपारी स्वराज्याचा नाद गुंजला
मायभूमीच्‍या सेवेसाठी शिवबा आमचा झुंजला || धृ. ||

शिवनेरीवर सिंह जन्मला, आम्हा रयतेचा वाली
जिजाऊचा छावा लढला, करूनी हाताच्या ढाली
या मातीचे पांग फेडण्याचा 'जाणता राजा' अवतरला.
सह्याद्रीच्या कडे कपारी स्वराज्याचा नाद गुंजला || १. ||

तलवारीच्या टोकावरती महाराष्ट्राची शान राखली
शक्ती आणिक युक्तीने शत्रूंनाही धुळ चाखली
दरीदरीतून बोल उमटले मुलुख अवघा दुमदुमला
सह्याद्रीच्या कडे कपारी स्वराज्याचा नाद गुंजला || २. ||

मर्दुमकीची शर्थ इथे ही मर्द मावळा भिडला
गनिमी कावा करून जिंकला गड कोटी वसला
थरथरली ती मोगलशाही ध्वज हिंदवी फडफडला
सह्याद्रीच्या कडे कपारी स्वराज्याचा नाद गुंजला || ३. ||

सह्याद्रीच्या कडे कपारी स्वराज्याचा नाद गुंजला
मायभूमीच्‍या सेवेसाठी शिवबा आमचा झुंजला.


■■  सतिश कोंडू खरात
                  वाशिम
           ९४०४३७५८६९
---------------------------------------------

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा