Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

वाढता वाढता वाढे… पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; देशातील चार महानगरांपैकी मुंबईत सर्वात महाग इंधन


Petrol Diesel Price on 30 September 2021


वाढता वाढता वाढे… पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; देशातील चार महानगरांपैकी मुंबईत सर्वात महाग इंधन

देशभरामध्ये गुरुवारी म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी इंधनदरवाढ करण्यात आलीय. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर २५ पैसे प्रती लीटरने वाढवण्यात आले असल्याने कालपर्यंत १०१.३९ रुपयांना मिळणारं पेट्रोल आज १०१.६४ रुपयांना मिळत आहे. तर डिझेलच्या दरांमध्ये ३० पैसे प्रती लीटरने वाढ करण्यात आलीय. कालच्या ८९.५७ रुपये प्रती लीटरवरुन आज डिझेलचे दर ८९.८७ रुपये प्रती लीटरवर पोहचले आहेत. इंडियन ऑइल कॉर्परेशनने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०७.७१ रुपये प्रती लीटर तर डिझेलचे दर ९७.५२ रुपये प्रती लीटरपर्यंत पोहचले आहेत.

देशातील चार प्रमुख महानगरांपैकी मुंबईमध्ये इंधनाचे दर सर्वाधिक आहेत. राज्यांमध्ये तेथील स्थानिक सरकारकडून म्हणजेच राज्य सरकारांकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे इंधनाच्या दरांमध्ये तफावत जाणवते. मागील सहा दिवसांमध्ये डिझेलचा दर प्रती लीटरमागे १ रुपया २५ पैशांनी वाढलेत. 

जाणून घ्या तुमच्या शहरामधील दर

देशामधील तिन्ही तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी रोज सकाळी सहा वाजता इंधनाच्या नवीन दरांची घोषणा करतात. या नव्या दरांची माहिती त्यांच्या वेबसाईटवर मिळते. तर दुसरीकडे फोनवरही एसएमएस करुन नवीन दर तपासण्याची सुविधा देण्यात आलीय. 92249 92249 क्रमांकावर एसएमएस पाठवून पेट्रोल डिझेलच्या नवीन दरांबद्दल माहिती मिळवता येते. RSP < स्पेस > पेट्रोल पंप डिलरचा कोड लिहून 92249 92249 वर पाठवावा


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256
Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा