Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

करोनाकाळात रेल्वेला मालवाहतुकीचा आधार!


करोनाकाळात रेल्वेला मालवाहतुकीचा आधार!
Advertisement

करोनाकाळात रेल्वेला मालवाहतुकीचा आधार!



करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये संपूर्ण टाळेबंदी झाल्यानंतर प्रवासी वाहतूक बंद झाली


गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१ टक्के वाढ; ११५ कोटींचा महसूल


करोना काळात गेल्या वर्षापासून मध्य रेल्वेने मालवाहतुकीवर लक्ष केंद्रित केले असून, दोन वर्षांच्या कालावधीत वाहतुकीचे नवनवे विक्रम केले जात आहेत. प्रामुख्याने भुसावळची केळी, नागपूरची संत्री, सोलापूरचे डाळिंब, कांदा आणि पुण्यातून साखर, पेट्रोलियम पदार्थ तसेच मोटारींची देशाच्या विविध भागांत वाहतूक करण्यात आली. या वाहतुकीतून रेल्वेला चांगलाच आधार मिळाला आहे. अलीकडेच झालेल्या विक्रमामध्ये गेल्या पाचच महिन्यांत मध्य रेल्वेने सुमारे ३० दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. ती गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१ टक्क्यांनी अधिक असून, त्यातून ११५ कोटींचा महसूल मिळाला आहे.

करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये संपूर्ण टाळेबंदी झाल्यानंतर प्रवासी वाहतूक बंद झाली. या काळात रेल्वेने मालवाहतुकीला प्राधान्य दिले. रेल्वेच्या व्यवसाय वृद्धी पथकाने त्यासाठी पुढाकार घेतला. टाळेबंदीत रस्ते वाहतूकही बंद असल्याने या काळात अत्यावश्यक सेवांसह देशाच्या विविध भागांत वस्तू आणि शेतीमाल पाठविण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देण्यात आले. त्यातून रेल्वेला नवनवे ग्राहकही मिळाले, सुरक्षित, वेळेत आणि कमी खर्चात वाहतूक होत असल्याने उत्पादक कंपन्यांनी रेल्वेचा पर्याय स्वीकारला. त्यातून २०२०-२१ मध्ये मध्य रेल्वेने ६२.०२ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट या पाचच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ३० दशलक्ष टन मालवाहतूक केली. गेल्या वर्षी याच कालावधीतील मालवाहतुकीपेक्षा यंदा ४१ टक्क्यांनी अधिक आणि विक्रमी मालवाहतूक झाली.

मालवाहतुकीमध्ये शेतमालाच्या वाहतुकीचा वाटाही मोठा आहे. २०२१-२२ या वर्षात मध्य रेल्वेने ३२४ किसान रेल्वे चालविल्या. त्यातून राज्यातील विविध भागातील वैशिष्ट्यपूर्ण शेती उत्पादनाशिवाय इतर वस्तूंची वाहतूकही करण्यात आली. भुसावळमधील केळी, नागपूरचे वैशिष्ट्य असलेली संत्री, सोलापूरमधून कांदा, डाळिंब आणि पुण्यातून पश्चिम महाराष्ट्रात उत्पादित होणारी साखर आणि लोणीवरून पेट्रोलियम पदार्थांची वाहतूकही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. प्लाय अ‍ॅश, कोळसा आणि रसायनांच्या वाहतुकीचाही त्यात समावेश होता. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अणिल कुमार लाहोटी यांनी रेल्वे मालवाहतुकीबाबत नुकताच आढावा घेतला. अतिरिक्त महाव्यवस्थापक बी. के. दादाभोय त्या वेळी उपस्थित होते.

वाहन उद्योगांचा वाटाही महत्त्वाचा

मध्य रेल्वेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या वाहतुकीमध्ये पुणे परिसरातील वाहतूक उद्योगांचा वाटाही महत्त्वाचा आहे. पिंपरी-चिंचवड, चाकण आदी औद्योगिक पट्ट्यातील वाहन उद्योगांच्या मोटारी रेल्वेच्या माध्यमातून देशात विविध भागांत पाठविल्या जातात. बांगलादेशातही पुण्यातून मोटारींची वाहतूक करण्यात आली आहे. मोटारींच्या वाहतुकीसाठी खास डबेही तयार करण्यात आले आहेत. वाहनांसह विविध वस्तूंच्या वाहतुकीसाठी ऑगस्टमध्ये एकट्या पुणे रेल्वेकडून ७१ रेल्वे पाठविण्यात आल्या. गेल्या पाचच महिन्यांत मालवाहतुकीतून विक्रमी ९५.२३ कोटींचे उत्पन्न मिळविले. पुणे रेल्वेच्या व्यवस्थापक रेणू शर्मा, वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी करण्यात आली.

...........................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा