Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

जागतिक पर्यटन दिनानिमित्त 'अपरिचित रत्नागिरी'वर परिषद

   



जागतिक पर्यटन दिनानिमित्त 'अपरिचित रत्नागिरी'वर परिषद

रत्नागिरी - जागतिक पर्यटन दिनानिमित्त अपरिचित रत्नागिरी या विषयावरील परिषद रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने येत्या सोमवारी (ता. २७ सप्टेंबर) रोजी आयोजित केली आहे. मारुती मंदिर येथील हॉटेल व्यंकटेश येथे कोरोना विषयक नियम पाळून परिषद होणार आहे. परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी दिली.

इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, निसर्गयात्री संस्था आणि मैत्री ग्रुपच्या सहकार्याने ही परिषद सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. उदघाटनावेळी ग्लोबल कोकणचे अध्यक्ष संजय यादवराव, बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर केशव कुमार, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, रायगडच्या हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, केंद्रीय दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य संतोष गांगण, अजित गाडगीळ, अभिजित दातार, माजी आमदार बाळ माने आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, आणि प्रमोद जठार आदी उपस्थित राहणार आहेत.

परिषदेत पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संचालक सारंग ओक, आनंदवन निवासचे संचालक डॉ. गिरीश बापट, डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई, साताऱ्याचे कृषी पर्यटन अभ्यासक प्रमोद शिंदे, रोबोटीक डिजिटल गार्डनचे प्रवीण किणे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी ही परिषद महत्त्वाची असून यामध्ये हॉटेल व्यावसायिक, पर्यटन व्यवसायात येण्यास इच्छुकांसह होम स्टे, निवास न्याहरी योजना चालक आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन राजू भाटलेकर यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी राजू भाटलेकर (9130383666), सुहास ठाकूरदेसाई (9822290859), सुधीर रिसबूड (9422372020) किंवा मकरंद केसरकर (9967318481) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

..........
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा