Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

‘पूरस्थितीवर नियंत्रणासाठी पर्यावरण समृद्धतेची गरज’


‘पूरस्थितीवर नियंत्रणासाठी पर्यावरण समृद्धतेची गरज’

‘पूरस्थितीवर नियंत्रणासाठी पर्यावरण समृद्धतेची गरज’



पाण्याच्या समान वाटपाचा मुद्दा अधोरेखित


 वातावरण बदलामुळे ओढवणाऱ्या पूरस्थितीला के वळ अभियांत्रिकी पद्धतीने उत्तर न देता मुंबईचे पर्यावरण समृद्ध करण्याची गरज असून गेली अनेक वर्षे मुंबईच्या समुद्रात घालण्यात आलेला हे पूरस्थितीचे कारण आहे, असे मत पर्यावरण, जलव्यस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. पालिकेतर्फे  तयार करण्यात येणाऱ्या वातावरण कृती आराखडय़ाविषयीच्या चर्चासत्र मालिके तील अखेरचे चर्चासत्र गुरुवारी पार पडले. ‘शहरातील पूरस्थिती आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन’ असा या सत्राचा विषय होता.

‘गेल्या अनेक वर्षांत मुंबईच्या समुद्रात घालण्यात आलेल्या भरावाचा परिणाम म्हणून मुंबईत अलीकडे पूरस्थिती ओढवत आहे. शहराची रचना करताना नाले, पाणथळ जागा दुर्लक्षित राहात आहेत,’ असे म्हणत पेनिन्सुला विद्यापीठाचे प्राध्यापक निखिल आनंद यांनी खाऱ्या जमिनींवर परवडणारी घरे बांधण्याच्या योजनेकडे लक्ष वेधले. ‘खासगी भागीदारीतून पंचतारांकित स्वच्छतागृहे काही ठिकाणी बांधली जात असली तरी अजूनही अनेक ठिकाणी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी घरांच्या जवळपास स्वच्छतागृहे नाहीत. त्यामुळे बरेचसे मलजल नाल्यांमध्ये मिसळते व स्वच्छतागृहांमधील मलजलही नाल्यातच सोडले जाते,’ असे निरीक्षण टाटा समाजविज्ञान संस्थेच्या (टीस) प्राध्यापिका अमिता भिडे यांनी नोंदवले.

पर्यावरणाला अधिकाधिक समृद्ध करून पूरस्थितीचा सामना करता येईल अशी भूमिका चर्चेत सहभागी सर्वच तज्ज्ञांनी मांडली. ‘पाणी हक्क समिती’चे सीताराम शेलार यांनी पाण्याच्या समान वाटपाचा मुद्दा उपस्थित के ला. ‘आजही २० लाख लोकसंख्येला आपण अधिकृतरीत्या पाणी नाकारत आहोत आणि दुसऱ्या बाजूला बरेचसे पाणी वायाही घालवत आहोत,’ ही बाब त्यांनी निदर्शनास आणली. युवा संस्थेच्या रोशनी नगेअल्ली यांनीही वंचित वस्त्यांमधील आणि बेघर नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. चर्चेतील एक तज्ज्ञ रिआ शाह यांनी पूरस्थितीच्या दृष्टिकोनातून इमारतींचे परीक्षण करण्याची गरज व्यक्त केली.

..................................
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा