Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin eकाव्यपुष्प

आला गोविंदा गोपाळा

आला रे गोविंदा आला

गड्यांनो हंडी फोडू चला

थरावर थर उंचावर बांधा

नाचतील रे पोरं आनंदा

केला दह्यादुधाचा काला

मंडळींस सर्वा वाटून टाका

गोड प्रसाद हंडी उत्सवाचा

कोणी कृपया नासवू नका

गोविंदांमध्ये दिसला उभा 

कृष्ण कन्हैया नंदलाला 

माखन चोरायला आला

आमचा हा बासरीवाला

सूर बासरीचे संदिग्ध झाले 

दाहीदिशा चौघडे वाजले 

गोविंदापथकांसह प्रांगणात

सारे नाशिककर आनंदीले 

बोला गोविंदा रे गोपाळा 

यशोदेच्या तान्ह्या बाळा

सखा आमचा लेकुरवाळा

फोडतो हंडी नंद गोकुळा


- नयन धारणकर

-------------------------------------

 

 ..प्रभा..


शांत आनंद प्रहरी

मंद धुंद पहाटवारा,

गंध सुमनांचा करी

प्रसन्न परिसर सारा.


..नखाते ज्ञानेश्वर..

      .परभणी.

 

-------------------------------------


ओळखीतून होते मैत्री 

दिर्घकाळ आनंद देणारी 

सवय होताच एकमेकांची

सहवासातून विश्वास शोधणारी सौ. मधुरा कर्वे. ( भावगंधा )

पुणे

-----------------------------------

       

पाऊस सरी

सवे घेऊन वारा

जीवन थारा


दरवळतो

हा सुगंध चौफेर

चित्त बाहेर


ओल्या मातीचा

स्पर्श पाया भावतो

स्वस्थ राहतो

सौ उषा राऊत

--------------------------------------

 श्रावणधारा


खट्याळ पाऊस उनाड वारा

रिमझिम रिमझिम श्रावण धारा


कधी झळाले सोनेरी ऊन

उठे तरारून गवताचे मन

क्षणात झरती धरणीवरती

शुभ्र टपोऱ्या गारा

रिमझिम रिमझिम श्रावण धारा


निळ्या मंडपा हिरवी झालर

इंद्रधनूची नक्षी सुदंर

रानफुलांच्या रांगोळीचा 

स्वर्गीय नजारा

रिमझिम रिमझिम श्रावण धारा


फुलपाखरे गाती गाणी

स्वच्छंदे उडती पानोपानी

लयीत देतो साथ तयांना 

झुळझुळणारा झरा

रिमझिम रिमझिम श्रावण धारा


क्षणात भिजती झाडे वेली

क्षणात येती उन्हे कोवळी

लपंडाव सावली ऊनाचा

खेळ अजब हा न्यारा

रिमझिम रिमझिम श्रावण धारा


अरूण मोर्ये

सत्कोंडी, रत्नागिरी

8806890558/8805704557

------------------------------------------------------


    आजची   चारोळी


   नियती तुझा खेळ आगळा

   कधी असा तर कधी तसा.

  हसता हसता कधी कोण रडेल?

   नाही कशाचा भरवसा.


   सौ. हेमा जाधव, सातारा

------------------------------------------

कोडे 

न कळे कसे हे आयुष्याचे

कोडे सहज सोडवावे

हसऱ्या क्षणांना जपावे की

क्षण हसरे पूर्वीचे आठवावे.....


कु.अंकिता आनंद धबडगावकर.

परभणी.

-------------------------------

 बाप आठव नेहमी..…

तुला बघायला मुली

वेळ मिळेना बापाला ।

नित्य सकाळी सकाळी

जावे लागते कामाला ।।


काय करणार सांग

कष्ट केले नाही तर? ।

तुला उपाशी राहता

बघणार जन्मभर? ।।


बापासाठी तूच परी

तूच वेदना नाशक ।

दुःख क्षणात भुलतो

अगं जगाचा मालक ।।


बोल बोबडे तुझेच

तरसतो ऐकायला ।

बाप कामात राहतो

तुझे पोट भरायला ।।


नको बापाला भुलूस

तुझ्या सुखाच्या क्षणात ।

बाप आठव नेहमी

जोड त्याच्यापुढे हात ।।


शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी

ता.दारव्हा, जि.यवतमाळ

मो.८८०५८३६२०७

-------------------------------------------------------

 कष्टकरी माझा बाप..…

कष्टकरी माझा बाप 

शेतकरी माझा बाप ।

नित्य जगास पोसतो

सेवेकरी माझा बाप ।।


घरदार सोडूनिया

रोज शेतात झोपतो ।

स्वतः उपाशी राहून

निगा पिकांची राखतो ।।


श्वेत सोनं पिकवतो

तरीपण स्वतः दीन ।

माझा बाप शेतामध्ये

जसा पाण्यामध्ये मिन ।।


माझे दुःख विसरतो

घाम बापाचे बघता ।

दुःखामध्ये राहूनही

क्षण सुखाचे टिपता ।।


जन्मभर ऋण कसा

कोण फेडणार त्याचे ।

बापाविन दावणार

कोण दिवस सुखाचे? ।।


शब्दसखा-अजय रमेश चव्हाण, तरनोळी

ता.दारव्हा, जि.यवतमाळ

मो.८८०५८३६२०७

--------------------------------------


 पूछ लेते


मोहब्ब्त करने से पहले पूछ लेते

दिल देने से पहले  हमें पूछ  लेते 


हमें तुम किस  तरह से  पसँद हो 

एक  बार  यह बात तुम पूछ लेते


दोस्ती से  तुमने शुरुआत की थी 

घुमाफिरा  ने से  सीधा  पूछ लेते 


तुम्हारा   जवाब  हा  था  लेकिन 

हमारा  जवाब भी जरा पूछ लेते


कुछ   पल  क्या  गुज़ारे   तुम्हारे

साथ  मेरी आँखों जरा  पूछ लेते 


मेनें भी  किसी से वादा किया है 

हाल-ए-दिल  मेरा भी पूछ  लेते 


नीक राजपूत

9898693535

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा