Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

महिला पोलिसांचे कामाचे तास आठ!

 


महिला पोलिसांचे कामाचे तास आठ!


राज्य पोलीस दलाचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : राज्यातील महिला पोलिसांचे कामाचे तास आठ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कुटुंबाची जबाबदारी आणि पोलीस दलातील नोकरी अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिलांना दिलासा मिळाला आहे.

महिला पोलिसांना आता केवळ आठच तास काम करावे लागेल. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सांगितले.  अनेक महिला पोलिसांना आठ तासांहून अधिक काळ ‘ड्युटी’ करावी लागत असल्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी महासंचालकांकडे येत होत्या. त्यामुळे पोलीस महासंचालक पांडे यांनी महिला कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन टप्प्याटप्प्याने महिला पोलिसांसाठी ‘आठ तास कर्तव्य’ अशी संकल्पना कशी राबवता येईल, याबाबत आराखडा तयार करण्यात आला होता. नागपूर, पुणे, अमरावती आणि नवी मुंबईत पहिल्या टप्प्यात ही संकल्पना राबवण्यास सुरुवातही करण्यात आली आहे. तेथील प्रतिसाद पाहून संपूर्ण राज्यात आठ तास कर्तव्याची संकल्पना राबवण्यात येणार आहे. महानगरांमध्ये महिला पोलिसांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते, अशा परिस्थितीतही नागपूर, पुणे, अमरावती आणि नवी मुंबई या शहरांमध्ये ही संकल्पना राबवण्यात यश आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. महिन्याभरात संपूर्ण राज्यात महिला पोलिसांसाठी ‘आठ तास कर्तव्या’ची संकल्पना अमलात आणली जाणार आहे.

महिला पोलिसांचे कामाचे तास १२वरून ८ करण्याचा निर्णय दिलासादायक आहे. कामाचे तास कमी करण्याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

पुरुष पोलिसांबाबत  निर्णय नाही

पुरुष पोलिसांच्या कामाच्या तासांबाबत मात्र कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यापूर्वी दत्ता पडसलगीकर मुंबईचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास आठ केले होते.

महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यात टप्प्याटप्प्याने करण्यात येईल.    – संजय पांडे,  पोलीस महासंचालक

..........
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा