Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

      

 शब्द लहरी 


ज्ञानेश्वरीतील   सुंदर  प्रतिमाने

       जयाते  अभ्यासाची  घरटी ।  यम
नियमांची  ताटी ।  जे  मनाते  सदा  मुठी।
धरूनी  आहाते .।।


        ते  ही  किजती  कासाविशी ।  या
इंद्रियांची  प्रौढी  ऐसी । जैसी  मंत्रज्ञाते 
विवसी  भुलती  का  ।।

      देखै  विषय  हे  तैसे ।  पावती ऋद्विसिद्धी चेनि  मिषे ।  मग  आकळती
स्पर्शे  इंद्रियांचेनि  ।।


          जे  साधक  आपल्या  भोवती  
अभ्यासाचे  घरटे  करून  यमनियमांची
ताटी  लावतात  आणि  मनाला  तर  सदा
मुठीत  ठेवतात .

        अशा  साधकाला  सुद्धा  ही  इंद्रिये
विषय  भोगण्या करिता  व्याकुळ  करून
टाकतात . एवढा  या  इंद्रियांचा  प्रताप
आहे.  ज्या  प्रमाणे  मांत्रिकास  जखीण
हडळ  भुलवून  चकविते.

          त्या  प्रमाणे  पहा  हे  विषय  
ऋद्विसिद्धी च्या  रूपाने   योग्याला  प्राप्त
होतात   व  योग्यांची  ही  मने  भ्रष्ट
करतात .

  
सौ.  शैलजा  जाधव (पाटील)
           चांदवड   नासिक
------------------------------------

 विचारधारा

प्रत्येक मुलगी लग्न करून जेव्हा  सासरी येते आणि सुखात नांदत असते. तरी ...  तीला , तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत माहेरची काळजी असते. हे, शंभर टक्के खरे, आहे. तसचं तिच्या माहेरच्यांनी सुद्धा त्याच प्रकारची तिची आठवण करावे, काळजी घ्यावी.  व, परिस्थितीमुळे तिच्यावर जर....कधी वाईट प्रसंग आले तर...तीला चांगले मार्गदर्शन करुन, मार्गदर्शक होण्याची भूमिका पार पाडावे.  जेणेकरून तिच्या जीवनात आलेले  असंख्य संकटे अगदी सहजपणे दूर निघून जातील.....

सौ. संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली

------------------------------
   निसर्ग

निसर्ग आपल्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या अनेक प्राणघातक आजारांपासून वाचवते. जे लोक निसर्गाच्या जवळ राहतात ते निरोगी आणि शांत आयुष्याचा आनंद घेतात.निसर्ग आपल्या कानांना स्पर्श करणारे पक्ष्यांचे गोड आवाज प्रस्तुत करतो, ताजी हवा चालवण्याचा आवाज जो आपल्याला पुन्हा चैतन्य देतो,नद्यांमध्ये वाहणार्‍या पाण्याचे आवाज आपल्याला आत हलवतात.सर्व महान कवी आणि लेखक जेव्हा त्यांना निसर्गाचे कोणतेही आकर्षक,मोहक आणि हृदयस्पर्शी दृश्य भेटतात तेव्हा ते लिखाण करतात.

सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा