Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

राजापूर-तळवडे गावात अवैध गोवा बनावटीची दारु विक्री करणा-या इको गाडीवर पोलिस पथकाची कारवाई




 राजापूर-तळवडे गावात अवैध गोवा बनावटीची दारु विक्री करणा-या इको गाडीवर पोलिस पथकाची कारवाई


रत्नागिरी प्रतिनिधी:-

राजापूर तालुक्यातील तळवडे येथे गोवा बनावटीची दारू वाहतूक करणा-या इको मारुती सुझुकीवर कारवाई करताना राजापूर पोलिसांनी सुमारे 90 हजार रूपयांची दारू जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजेश रामदास साळवी (राह.तळवडे बाजारवाडी) याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.  

या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश साळवी हे इको गाडीतून गोवा बनावटीची दारू वाहतूक करत असल्याची खबर राजापूर पोलिसांना मिळाल्यानंतर मंगळवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता तळवडे येथे धाड टाकत राजेश साळवी यांना दारू साठ्यासह ताब्यात घेतले. यावेळी गाडीमध्ये गोवा बनावटीच्या 89 हजार 601 रूपयांच्या दारूच्या बाटल्या आढळल्या या दारूसाठ्यासह दारू वाहतूक करण्यासाठी वापरलेली इको गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. सदर घटनेचे ठिकाण तळवडे किंजळस्करवाडी रोडलगत असलेले विजय केशव अकडे यांच्या घरासमोरील मोकळ्या भागात असे आहे. सदर घटनेत पोलीसांनी एकूण मुद्देमाल 2 लाख 89 हजार 601.6 एवढ्या किंमतीचा जप्त करण्यात आला आहे.

राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, पोलिस हेड कॉंस्टेबल के.आर.तळेकर, पोलीस नाईक एस.के.वीर, पोलिस शिपाई व्ही.गोलेनवार, पोलिस शिपाई आर.डी.कोत्रे, पोलिस शिपाई बी

ई.कोळी आदींनी ही कारवाई केली. सदर घटनेचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल के.आर.तळेकर करित आहेत.

..........................
------------------------------

www.freshnewz.in



Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा