Free Reporter Training

Free Reporter Training
Certified & full Corse Residential & Onlin e

रमजान गोलंदाजचे राष्ट्रीय महामार्ग विरोधात आमरण उपोषण

 रमजान गोलंदाजचे राष्ट्रीय महामार्ग विरोधात आमरण उपोषण


 खड्डे जैसे थे..! मात्र अधिकारीची दबंगिरी

 खड्डे भरण्याचे काम कंपनीचे महामार्ग अधिकाऱ्याची उर्मट उत्तरे

 जर काम कंपनीचे असेल तर तुमचे दुकान बंद करा:- रमजान गोलंदाज

 महामार्गची चाळण:तर लोकांची  मके मोडले

 सोनगिरी येथे महामार्ग लगत होणार आमरण उपोषणास होणार सुरवात


संगमेश्वर प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्गची अवस्था बिकट असून खड्डे भरा, खड्डे भरा अशी वेळोवेळी विनंती करून हि महामार्गचे खड्डे भरले गेलेच नसून उच्च न्यायलयाने महामार्गचे खड्डे तत्काळ भरण्याचे आदेश दिले असताना हि जाणून बुजून खड्डे भरले गेले नसल्याचे  दिसते. लोकांना होत असलेल्या त्रासा बद्दल रमजान गोलंदाज आक्रमक होऊन राष्ट्रीय महामार्ग विरोधात लेखी पत्र देऊन खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित विभागला खड्ड्याची जाणीव नसल्याचे दिसते. कोणतीही कारवाई केली गेली नसून ये रे माझ्या मांगल्या अशीच परिस्थिती सुरु असल्याने जो पर्यत खड्डे डांबराने भरण्यास सुरवात करत नाहीत तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा ठाम निर्णय रमजान गोलंदाज यांनी घेतला आहे.

                    संगमेश्वर तालुक्यातील सोनगिरी येथे महामार्ग लगत उपोषनास सकाळी १० वाजल्यापासून सुरवात झाली आहे.राष्ट्रीय महामार्गच्या अधिकाऱ्यांना जाणीव नसल्याचे दिसत असून खड्डे भरण्याचे काम कंपनीचे आहेत अशीच उत्तरे मिळतात.. जर काम कंपनीचे आहे मग आपली जबाबदारी काय? राष्टीय महामार्गचे दुकान मग बंद करा असा सल्ला हि रमजान गोलंदाज यांनी दिला आहे. आता माघार नसून खड्डे भरावेच लागतील एवढे संबंधित विभागाने लक्षात घेतले पाहिजे.या उपोषणास सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष वहाब दळवी, अनुसूचित जाती जमातीचे कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, धनाजी भांगे, जमूरत अलजी,मुझमीला काझी, अमित खातू, तैमूर अलजी, शोएब भाटकर, मकरंद गांधी, दिलदार कापडी, दत्तात्रय खातू, सलाउद्दीन बोट, बंटी खातू आदी सह अनेक लोकांनी पाठिबा दिला आहे






...........
------------------------------

www.freshnewz.in

Share on Google Plus

About Dainik Fresh News

OFFICE OF REGISTRAR OF NEWSPAPERS FOR INDIA Government of India MAHMAR/2011/39536 MUMBAI, RATNAGIRI, KOLHAPUR , SANGALI 8448440256,9422050977,9623454123
    Blogger Comment
    Facebook Comment

0 टिप्पणी(ण्या) :

टिप्पणी पोस्ट करा